११ प्रकारच्या वेगवेगळ्या पालेभाज्या :- 11 different types of leafy vegetables In Marathi

११ प्रकारच्या वेगवेगळ्या पालेभाज्या :- 11 different types of leafy vegetables In Marathi:-   हिरव्या पालेभाज्या खाणे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप चांगले आणि फायदेशीर आहे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये हे चवीला गोड असणारी भाजी आहे. भारतामध्ये या पालकांचा खूप जास्त प्रमाणात खाण्यात उपयोग केला जातो. या भाजीला हिंदी आणि इंग्रजी मध्ये या दोन्ही भाषेत पालक या नावानेच ओळखतात. सर्व लोकांना माहितीच आहे कि पालेभाज्या खाल्ल्याने आपल्याला सर्वात जास्त प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन, आणि मीटरलास मिनरल्स यांसारखे पोषक घटक मिळत असते.

११ प्रकारच्या वेगवेगळ्या पालेभाज्या :- 11 different types of leafy vegetables

 

11 different types of leafy vegetables

 

आणि याचा नियमित सेवन करणे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी चांगले देखील असते. पालेभाज्या या जास्त प्रमाणात हिवाळी हंगामात येत पावसाळ्यच्या सुरुवातीला या भाज्यांची लागवड करण्यात येते आणि त्यानंतर त्याची चांगल्या प्रकारे देखभाल करून त्याचे चांगले उत्पादन काढण्यसाठी हिवाळा येतो. पालेभाज्यातील सर्वात जास्त पोषक आणि आपल्या शरीराला चांगली ठरणारी भाजी पालक खूप लोकांना माहिती आहे कि पालेभाज्या आपल्या साठी खाणे चांगले असते परंतु खूप लोकांना हे सुद्धा माहिती नाही आहे कि कोणती पालेभाजी खाल्ली तर आपल्याला त्याचा जास्त फायदा होईल.

तर पालक ही भाजी आपळुणला सर्वात जास्त फायदेशीर आहे. आणि बाजारात याच किंमत देखील मोजकीच असते त्यामुळे सर्व लोक याला खरेदी करून खाऊ शकतात. हिरव्या पालेभाज्या मध्ये कॅल्शियम, बिट-कॅरोटीन, किंवा जीवनसत्व आणि पोषक घटक असतात. हिरव्या भाजमधील कॅरोटीन अ हे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. खूप वेळा लहान मुलाला किंवा मोठ्या लोकांना सुद्धा पोटाचा त्रास असला तर अशा लोकांना पालेभाज्या खाण्यास मनाई असते कारण हे कुठल्या कारणाने सांगितले जाते ते आज आपण बघणार आहोत. आणि पालेभाज्याधे मध्ये कोणते पोषक घटक आहेत.ते आज आपण बघणार आहोत. कुठली भाजी कोणत्या आजारासाठी फायदेशीर आहे ते आज आपण बघणार आहोत.

१) पालक :-  Spinach

पालक हे भाजी सर्वांनाच महित आहे. ही भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. या भाजीमध्ये लोह आणि पोषक घटक आहे. जे या भाजी मध्ये घटक आहे त्या घटकामुळे हाडे मजबूत करण्याचे काम होऊ शकते. पालक ही जास्त भाजी करायला आणि त्याचे वरन आणि कोणत्याही भाजीत मिसळतात. पालकांच्या भाजीच्या सेवनाने पोटात असलेला आजार थांबतो. ज्या लोकांना वारंवार जुलाब होत असतो त्याने पालक चे सेवन करावे अशा लोकांना त्याचा नक्कीच फायदा होईल. पालक खूप प्रकारच्या रोगांसाठी खूप मोठा उपाय मानला जातो.

२) मेथी :-  Fenugreek

मेथीची भाजी करून सर्व लोक खात असतात पण मेथीची दाणे सुद्धा त्याहून खूप जास्त प्रमाणात औषधी बनविण्यासाठी याचा वापर केला जातो. मेथीची भाजी मधुमेह रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. आपल्याला जर भूक लागत असेल तर मेथीच्या भाजीच्या सेवनाने आपली भूक वाढते. आपले पोटांचे अनेक आजार सुद्धा बरे होण्यास मदत होते. आपली पचनक्रिया सुद्धा सुधारण्यात मदत होते आणि आपल्या अन्नाचे पचन सुद्धा चांगल्या प्रकारे होत असते. मेथीचे दाणे यांपासून अनेक प्रकारचे मसाले सुद्धा बनवतात. आणि याचा आपल्या आरोग्यासाठी मोठा फायदा मानला जातो.

३) माठ :- Math

माठाची भाजी हे दोन प्रकारची असते. ते म्हणजे हिरवी माठ आणि लाल माठ हे भाजी जास्त प्रमाणात आपल्या शरीरातील वजन वाढविण्यासाठी वापरण्यात येत्ते. ज्या लोकांना मुतखड्याचा आजार आहे अशा लोकांना हे भाजी खाणे टाळावे कारण यामुळे त्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता असते. याची भाजी खूप चविष्ट लागत असते. या भाजीचा दुसरा प्रकार म्हणजे तांबडा माठ हा रक्त वाढविण्याचे काम करते.

४) मुळा:- Radish

मुळा हे जमिनीच्या आतमध्ये लागणाऱ्या पालेभाज्या आहे. मुळा मलमूत्राचा विकारावर फायदेशीर ठरू शकते. थोड्या जुना झालेल्या कच्या मूल्याचे सेवन केले तर पोटात गुबारा, मूळव्याध आणि पोटामध्ये गॅस होणे आणि अपचन सारख्या बिमार्याना मुळ्याचे सेवन केल्याने अशा प्रकारचे आजार बरे होतात. कच्चा मुळा खाणे हे फायदेशीर आहे.

५) अळू :- Aloo

अळू ही पालेभाजी शरीरामध्ये अत्यावश्यक आहे. हे पालेभाजी आपल्या शरीरातील रक्त वाढविण्याचे कमी करत असते. आपल्याला ताकद देणे आणि तसेच मलमूत्राचा विकारांना कमी करण्याचे काम करते. अळू या भाजीचा उपयोग ज्या महिलांना बाळंतपणात दूध कमी येत असते अशा वेळी या महिलांनी अळूचे सेवन करावे. अळू या पालेभाज्यांचे पाने आणि देठाची भाजी करत असतात.

६) अंबाडी :- Hemp

ही भाजी खूप आंबट आणि रुचकर अशी या भाजीची चव लागत असते. ज्या लोकांना त्वचेचा कुठला रोग आहे अशा लोकांनी हे आंबट भाजी खाऊ नये आणि ज्या लोकांना रक्ताचा विकार आहे अशा लोकांनी सुद्धा या भाजीचे सेवन कमी करावे. ही भाजी उष्ण आहे. ज्या लोकांना उष्णतेचा रोग आहे अशा लोकांनी या भाजीचंद सेवन करणे टाळावे. ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असते.

७) घोळ :- Confusion

या भाजीची चव ही काही प्रमाणात वेगळीच असते. आणि ही भाजी बुळबुळीत असते. ही भाजी थंड असते या भाजीचे सेवन केल्याने आपल्या अन्न पचन करण्यास मदत मिळते. आणि यकृताचे कार्य सुद्धा सुधरत असते.

८) चाकवत :- Chakvat

आपल्याला जेव्हा ताप येतो तेव्हा आपल्या तोंडाची चव जात असते अशा वेळी आपण चाकवत या भाजीचे सेवन करू शकतो. यामुळे आपल्या तोंडाला चंव येत असते. छातीमध्ये जर जळजळ होत असेल तर या भाजीला पातळ भाजी करून ते खाण्याचे करावे. आपल्याला ही भाजी आपल्या आवडीनुसार वेगवेगळे पदार्थ घालून बनवता येते.

९) तांदुळजा :- Rice

जे लोक नाजूक असतात अशा लोकांना ही भाजी खाणे उपयुक्त ठरू शकते. आणि त्याच सोबत गरोदर, वृद्ध लोकांना हि भाजी खाणे खूप फायदेशीर ठरू शकते. या भाजीचे सेवन केल्याने आपल्या डोळ्याचे आजार सुद्धा, खाज सुटणे, मलविरोध अशा प्रकारच्या आजारांना हे भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला त्याचा चांगला फायदा मिळू शकते. या भाजी मध्ये आपल्या शरीराला लागणारे सर्वच घटक आहे.

१०) करडई :- Safflower

या भाजीमध्ये उष्मांक कमी आहे तर या भाजीचे आपण सेवन केले ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे अशा लोकांना ही भाजी खाने फायदेशीर ठरू शकते याने आपले वजन नियंत्रित राहू शकते. जे लोक लठ्ठ आहे आणि ज्यांचे वजन कमी आहे अशा लोकांना ही भाजी फायदेशीर ठरू शकते. ज्या लोकांना डोळ्यांचा व त्वचेची समस्या आहे अशा लोकांनी करडई ही भाजी खाऊ नये.

११) शेपू :- Shepu

या भाजीला उग्रवास आहे त्यामुळे ही भाजी खुपजण खाण्यास टाळतात. पण उग्रवास असला तरी ही शेपूची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या भाजीचे सेवन केल्याने आपल्या पोटातील अनेक विकार दूर होते तसेच या भाजीच्या सेवनाने लहान मुलाचे पोट दुखणे जंतू कृती इत्यादी आजार बरे करण्यास मदत होते. कोणताही पदार्थ आपल्याला खूप चांगला असला तर त्याचा काही परिणाम होत असतोच आणि जे पदार्थ आपल्याला जितका फायदेशीर असते तितकाच हानिकारक सुद्धा असते त्यामुळे कोणत्याही भाजीचे सेवन नियमित आणि प्रमाणातच करावे. त्यामुळे लहान मुलांना ही भाजी द्याची असेल तर त्यांना चांगली द्यावी.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment