अवोकॅडो फळाची माहिती आणि आरोग्यासाठी फायदे :- Avocado fruit information and health benefits In Marathi

अवोकॅडो फळाची माहिती आणि आरोग्यासाठी फायदे :- Avocado fruit information and health benefits In Marathi:- अवोकॅडो हे फळ नाश्पतीच्या आकाराचे फळ आहेत. हे फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अवोकॅडो या वनस्पतीच्या फळाला अवोकॅडो नाशपाती ,बटर फ्रुट किंवा एलिगेटर नाशपाती असे म्हटले जातात. हे फळ लॉरेसी कुटुंबातील आहे.

अवोकॅडो फळाची माहिती आणि आरोग्यासाठी फायदे :- Avocado fruit information and health benefits

 

Avocado fruit information and health benefits

 

वैज्ञानिक दृष्ट्या पर्सिया अमेरिकना म्हणून सुद्धा ओळखले जाते. अवोकॅडो हे एक सदाहरित उष्ण कटिबंधीय फुलांची वनस्पती आहे. या फळ मध्ये मोठे बी असते . अवोकॅडो हे नाव फळाला व झाडाला दोघांना म्हटले आहेत. हे फळ दिसायला खूप सुंदर आहेत. अवोकॅडो हे एक अद्वितीय फळ आहे कारण या फळामध्ये कर्बोदकांमध्ये घनता असते, हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशशीर आहे. या फळामध्ये निरोगी चरबी असतात.

मेक्सिको हा जगातील सर्वात मोठा अवोकॅडो उत्पादक देश आहे. हे भारतात व्यवसायिकरित्या घेतले जाणारे पीक नाही आणि भारतातील दक्षिण मध्य राज्य जसे की, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आणि महाराष्ट्र आणि पूर्वेकडील सिक्कीम या राज्यामध्ये त्याची लागवड कमी प्रमाणात केली जाते. अवोकॅडो या फळाचे झाड साधारणपणे २० मीटर उंचीपर्यंत वाढत असते. या झाडाला पानाच्या अक्षांमधून फुले लागत असतात.

हिरव्या आणि पिवळ्या रंगाची फुल येत असतात,आणि तेवढी आकर्षक नसतात. नाशपती फळाचा आकार ७-२० सेमी लांब असते, आणि या फळामध्ये मोठी बी असते. आणि अवोकॅडो फळाचे वजन हे साधारणतः १०० ग्रॅम ते १००० ग्रॅम वजनाचे राहत असते. अवोकॅडो फळाच्या १०० हुन अधिक जाती जगभरामध्ये आहे. अवोकॅडो फळामध्ये हॅस अवोकॅडो हि सर्वात लोकप्रिय जात आहे. हे फळ आपल्याकडे साधारणतः ७०-१०० रुपयाला एक असे विकायला असते.

या फळामध्ये अनेक घटक आहेत. पोटॅशियम, मॅग्नेशियम फोलेट, जीवनसत्त्वे, सी, ई आणि के इत्यादी पोषक आणि अँटिऑक्सिडेन्ट उपलब्ध या फळामध्ये आहे. अवोकॅडो या फळा मध्ये निरोगी फॅटी ऍसिड आणि फायबर चे प्रमाण भरपूर आहे. अवोकॅडो हे फळ एक शक्तिशाली पोषक बुस्टर म्हणून असते. अवोकॅडो या फळ मध्ये कर्करोगाशी लढा देणारी पोषक तत्त्वे या फळामध्ये उपलब्ध आहे. अवोकॅडो या फळाला बटर फ्रुट असे देखील संबोधले जाते. म्हणूनच हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे.

अवोकॅडो हे फळ ब्राझील,फिलिपिन्स,इंडोनेशिया,केरळ( दक्षिण भारत),व्हिएतनाम, मध्ये अवोकॅडो मिल्कशेक, मिष्टान्न आणि आइसक्रीम हे अवोकॅडोसह सर्वात प्रसिद्ध मिष्टान्न आहे.

अवोकॅडो फळ खाण्याचे फायदे:- Benefits of eating avocado fruit

 

Benefits of eating avocado fruit

 

अवोकॅडो हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. आपल्या शरीरातील फिटनेस साठी खूप फायदेशीर आहे, या फळात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आहे. त्यामुळे हे फळ सर्व फिटनेस लोकांच्या आहारातील प्रमुख फळ मानले जाते. या फॅटी ऍसिड असल्यामुळे अवोकॅडोवर नैसर्गिक अवोकॅडो तेल तयार केले जातात. या फळाचे तेल आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या फळाच्या तेलामुळे हृदय निरोगी राहत असते.

अवोकॅडो या फळाचे तेल इतर तेलापेक्षा महाग आहे. ते तेल विशेषतः सॅलड ड्रेसिंग आणि डीप्स बनवण्यासाठी उपयोगात आणले जाते. हे फळ खाण्यासाठी गोड नसते, या फळाची चव मखमली पोतसह एक सूक्ष्म अद्वितीय चव देत असते. अवोकॅडो कच्चा वापरला जातो कारण दीर्घकाळ शिजवल्याने त्याची चव कडू लागत असते. अवोकॅडो हे फळ हृदयासाठी फायदेशीर आहे. अवोकॅडो हे आपल्या आहारात एक आयोग्यदायी घटक आहे.

ज्यामुळे उच्च कॊलेस्टेरॉल वर उपचार करण्यास मदत मिळत असते. आणि हृदय विकाराचा धोका कमी होतो. असे म्हटले आहे कि जेव्हा हे फळ पिकते तेव्हा या फळात सॅच्युरेटेड फॅट ची पातळी कमी होते आणि ओलिक ऍसिड ची पातळी वाढत असते. आणि त्यासोबतच अवोकॅडो या फळात पोटँशियमचा चांगला स्रोत आहे,त्यामुळे रक्तदाब नियंत्रित असते. आणि हृदय विकाराचा धोका टळतो.

जर तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास अवोकॅडो या फळाचे सेवन करणे फायद्याचे आहे. या फळामध्ये अनेक घटक आहेत. पोटॅशियम, मॅग्नेशियम फोलेट, जीवनसत्त्वे, सी, ई आणि के इत्यादी पोषक आणि अँटिऑक्सिडेन्ट उपलब्ध या फळामध्ये आहे. आपल्या शरीरातील अनेक रोगांसाठी हे फळ उपयोगाचे आहे. आपल्या शरीरातील हाडे सुद्धा मजबूत होते. अवोकॅडो हे फळ वृद्ध लोकांच्या संज्ञानातम्क कार्यामध्ये सुधारणा करण्याचे काम करते.

या फळांमुळे मेंदूतील ल्युटीन ची पातळी वाढवते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवते,त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढत असते. यामुळे वृद्ध लोकांना निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि वृद्ध लोक निरोगी राहण्यास मदत होते. अवोकॅडो या फळात काही रासायनिक संयुगे देखील राहते त्यामुळे यकृताचे नुकसान कमी होते. आपल्या शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकते. त्यामुळे यकृताला विविध आरोग्य परिस्थितीपासून संरक्षण देत असते.

अवोकॅडो हे बहुमोल फळ आहे, जे कामवासना उत्तेजित करते. आणि लैंगिक आरोग्यास मदत करत असते. अवोकॅडो या फळामध्ये लोह,जस्त, तांबे, पोटॅशियम निरोगी आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स इत्यादी अवोकॅडो या फळामध्ये पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे तुमची जोम आणि सेक्स ड्राईव्ह वाढते.

अवोकॅडो या फळात भरपूर पोषक तत्त्वे आहे जसे कि खनिज पोटॅशियम,लोह,फोलेट,जीवनसत्त्वे ए,सी,ई,के आणि जस्त व तांबे गर्भांची वाढ आणि विकासाच्या महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. आपली पचनक्रिया सुद्धा चांगली होते. आणि उच्च रक्तदाबासाठी हे फळ अत्यंत उपयोगाचे आहे. अवोकॅडो या फळांचा रस गर्भवती महिलांना अनावश्यक वजन टाळण्यास मदत होते.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment