मुळा खाण्य्याचे फायदे :-Benefits of eating radish In Marathi

मुळा खाण्य्याचे फायदे :-Benefits of eating radish In Marathi:-  मुळा आपण अनेकदा एखाद्या कार्यक्रमात किंवा लग्न समारंभात गेले असता काही ठिकाणी आपल्याला सलाद मध्ये मुळ्याचा समावेश पाहायला मिळतात. पालेभाज्या तसेच कंदमूळ खाणे आपल्याला खूप फायदेशीर आहे. आणि मुळा सुद्धा याचाच एक प्रकार आहे. मुळा खाणे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामधून मिळणारे अनेक घटक आपल्याला खूप फायदेशीर आहे.

आणि हा आपण कोणत्याही पदार्थात मिळवून खाऊ शकतो. किंवा त्याची भाजी सुद्धा बनवूं शकतो. परंतु मुळा कच्चा खाणे आपल्याला खूप फायदेशीर ठरते. आपण घेत असलेल्या आहारात आपण मुळ्याचा नक्कीच समावेश करतो. मुळ्या चे अनेक प्रकार आहेत कोणत्याही प्रकारे आपण मुळ्या चे सेवन करू शकतो.

मुळा खाण्य्याचे फायदे :- Benefits of eating radish

 

Benefits of eating radish In Marathi

 

कोण-कोणते मुळे खायला तिखट असतात. आणि खूप लोकनाच्या तोंडाला ते झोनबतात त्यामुळे खूप लोक मुळा खाण्यास नकार सुद्धा देत असतात. पण त्या लोकांना हे माहिती नसते कि मुळा खाण्याचे खूप फायदे आहेत. जे लोक मुळा खात नाही अशा लोकांनी त्यांच्या आहारात मुळ्याचा नक्कीच समावेश करायला हवा. कारण हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आणि आपण याचे नियमित सेवन करायला हवे जेणे करून आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घेता येईल. मुळा

खायचे आपल्या आरोग्यालाच नाही तर त्यामुळे सौंदर्य सुद्धा सुधारते आणि आपली त्वचा सुद्धा सुधारण्यात मदत करते. खूप लोकांना चेहऱ्यावर पिंपल्स चा त्रास असतो काहींना हा त्रास कमी असतो तर काहींना खूप जास्त असतो. तर आपण त्यासाठी मुळ्याचे नियमित सेवन करायला हवे. जेणेकरून आपला हा त्रास कमी होईल. आणि आपले सौंदर्य चांगले होण्यास मदत होते.

मुळ्यामधील पोषक घटक :- Nutrients in value

मुळ्यामधे असणारे सर्वच घटक आपल्याला फायदेशीर आहेत. आणि पोषक आहे. यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान नाही आहे. परंतु खूप लोकांना माहिती नाही कि ते पोषक घटक म्हणजे काय. ते म्हणजे मुळ्यात पाणी, एनर्जी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फायबर, साखर, कॅल्शियम, आर्यन, मॅग्नेशियम असे अनेक घटक असतात जे आपल्याला खूप फायदेशीर ठरतात आणि मुळ्यातील घटकांचा आपल्याला खूप फायदा आहे. यातील सर्व घटक आपल्या शरीरातील वेगवेगळ्या भागांसाठी फायदेशीर आहे.

आरोग्यासाठी मुळा खाण्याचे फायदे :- Health benefits of eating radish

१) मुळा खाण्याचे आपल्या शरीराला खूप फायदे आहे. खूप लोकांना सध्या वाढत असलेल्या प्रदूषणामुळे श्वास घेण्यात त्रास होत असतो आणि त्यामुळे आपल्याला शरीरात दूषित हवा जात असते आणि आपले आरोग्य खराब होण्याची भीती आपल्यावर सतत बनलेली असते. आणि हृदयाचा त्रास हा कमी असताना आपल्याला त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. एका माहिती प्रमाणे मुळ्यात नायट्रेट हा घटक असल्याने आपल्याला हृदयाच्या आजारापासून दूर ठेवण्याचे काम करते.

२) सध्या खूप लोकांना मधुमेहाचा त्रास असते आणि हा त्रास जास्त प्रमाणातील लोकांना पाहायला मिळते आणि त्यावर खूप लोक उपचार सुद्धा करत असतात. तर काहींना यावर फायदा मिळतो तर काहींना त्याचा काहीच फायदा होत नाही आणि असे लोक एखादे दुसरे उपाय सुरु ठेवतात त्यातीलच एक उपाय म्हणजे मुलाला मुळ्यात अँटी-ऑक्सिडेन्ट आणि एनर्जी असल्याने आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्याचे काम मुळा करत असते. मुळयात खूप प्रमाणात पाणी असल्याने आपल्या शरीरात ग्लुकोज भरण्याचे काम मुळा करत असते ज्यामुळे आपल्या शरीराला रक्तपुरवठा सुरळीत होते.

३) मूत खड्याची समस्या खूप लोकांना सुरु झाली आहे. आणि त्या लोकांना त्यापासून सुटका हवी असल्यास ते लोक मुळ्याचा सेवन करू शकतात आणि हे त्यांच्या आरोग्यासाठी देखील कामात येते. आणि ही समस्या झाल्यास आपले पोट खूप खराब दुखते. आपण त्यासाठी मुळा आपल्या आहारात खाऊ शकतो. मुळ्यात योग्य प्रमाणात कॅल्शियम असल्याने आपल्याला त्याचा फायदा होतो.

४) मुळ्याचे वेगवेगळे फायदे आहेत. अनेक समस्यां वर मुळा हा उपाय म्हणून काम करत असतो. मुळयामध्ये उच्चं प्रमाणात फायबर असल्याने बदकोष्टासाठी देखील मुळा फायदेशीर ठरू शकते. त्याचा त्वचेसाठी सुद्धा चांगले फायदे आहेत. कारण मुळ्यामधे व्हिटॅमिन सी चे प्रमाण आहे जे त्वचेसाठी अँटी-ऑक्सिडेन्ट म्हणून काम करत असते. त्वचेच्या अनेक आजारासाठी मुळा हा फायदेशीर आहे. करसांसाठी सुद्धा मुलं खूप फायदेशीर आहे. मुळ्याची जर पेस्ट करून आपण केसांना लावली तर ते हेअर मास्क म्हणून काम करत असते त्यामुळे आपले केस मजबूत व दाट होत असते. केसांचे अनेक विकार दूर होतात.

५) खूप लोकांना सध्या चेहऱ्यावर पिंपल्स असतात आणि हे येण्याचे कारण म्हणजे आपण पाणी कमी पीत असते. आणि यामुळे आपल्या शरीराला पुरेसे पाणी मिळत नाही. त्यासाठी आपल्याला मुळा खाणे खूप फायदेशीर ठरते. मुळ्यात मुबलक प्रमाणात पाणी असल्याने त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो. आणि आपली समस्या दूर होते.आणि आपल्याला अशा समस्यां पासून सुटका मिळते. मुळ्याची पेस्ट बनवून सुद्धा चेहऱ्याला लावू शकतात. हे सर्व करण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे.

 

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment