BENIFITS AND INFORMATION OF KISAN CREDIT CARD In Marathi

BENIFITS AND INFORMATION OF KISAN CREDIT CARD In Marathi:- आपला भारत देश हा प्राचीन काळापासून कृषिप्रधान देश मानला जातो. देशामधील अनेक लोक आजपण शेतीतून उदरनिर्वाह करत आहे. देशाच्या जीडीपीमध्ये कृषीचे योगदान हे १७ ते १८ टक्के आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आखत आहे.

BENIFITS AND INFORMATION OF KISAN CREDIT CARD

 

BENIFITS AND INFORMATION OF KISAN CREDIT CARD

 

जेणेकरून शेतकऱ्याला याचा फायदा झाला पाहिजे. त्यातली एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड आहे. शेतीचे उत्पादन अनेक गोष्टीवर अवलंबून आहे. जर हवामानाने शेतकऱ्याला सात दिली तरच त्याचा शेतकऱ्याला याचा फायदा मिळणार. अनेक वेळा वादळ, पूर ,अतिवृष्टी सुद्धा येत असते. इत्यादी मुळे पिकांना अनेक नुकसान होत असते.

तेव्हा शेतकऱ्याकडे पैशाची अडचण भासत असते. तेव्हा काही शेतकरी व्याप्याऱ्याकडून व्याजदराने कर्ज सुद्धा घेतात. अशा परिस्थिती शेतकऱ्याला येऊ नये यासाठी आता सरकारने किसान क्रेडिट कार्ड आणले आहे. आपल्या भारतामध्ये किसान क्रेडिट कार्ड हि योजना १९९८ साली आली होती.

या कार्ड मुळे शेतकऱ्याला स्वस्त व्याजदरात कर्ज मिळण्याची तरतूद आहे. शेतकरी जे शेतीवरच अवलंबून घर चालवत असते अशावेळी जर शेतातील नुकसानीमुळे दुबार पेरणीसाठी कर्जाची गरज लागते अशा टाईमला क्रेडिट कार्ड हे आपल्याला खूप फायदा देऊ शकतो.

किसान क्रेडिट कार्ड काढण्याचे फायदे:- Benefits of Kisan Credit Card withdrawal

 

Benefits of Kisan Credit Card withdrawal

 

शेतकऱ्यांसाठी हि योजना खूप महत्वाची मानली जात आहे. यामुळे अनेक शेतकऱ्याला कर्जाची आवश्यकता असते अशा टाइमाला जर आपल्याकडे किसान क्रेडिट कार्ड जर असले तर त्याच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्याला कमी व्याज दरात ३ लाखापर्यंत कर्ज मिळत असते. हे कर्ज केवळ ४ टक्याच्या व्याजदरात दिले जाते. जर तुम्हाला याचा लाभ घ्याचा असेल तर तुमचे वय १८ वर्षा पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला हे कर्ज मिळणार.

व शेतकऱ्याचे वय जर ७५ वर्षापेक्षा जास्त असेल तर याचा फायदा मिळणार नाही. या योजनेचा फायदा १८ वर्षापेक्षा जास्त आणि ७५ वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार. क्रेडिट कार्ड काढण्याचे शेतकऱ्यासाठी अनेक फायदा आहे ज्यामुळे शेतकऱ्याला दुसऱ्याकडे कर्ज मागण्याची गरज पडणार नाही. ज्याच्या नावावर शेती आहे अशा लोकांचेच किसान क्रेडिट कार्ड हे निघत असते. अन्य लोकांचे कार्ड निघणार नाही.

केवळ या योजनेचा शेतकऱ्यालाच फायदा मिळणार. शेतकऱ्याला शेती करत असताना बिजाई घेण्यासाठी, खात घेण्यासाठी, फवारणीसाठी औषधी घेण्यासाठी इत्यादी गोष्टीसाठी शेतकऱ्याला पैशाची गरज लागू शकते अशा वेळी जर आपले किसान क्रेडिट कार्ड जर काढून राहले तर या योजनेतर्फे कर्ज घेऊ शकणार. व आपल्या याचा फायदा खूप मिळणार. यासाठी आता अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड काढत आहे. व आपले किसान क्रेडिट कार्ड सुद्धा लवकर मिळत असते.

किसान क्रेडिट कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे :- Required Documents for Kisan Credit Card

1.आधार कार्ड
2.मतदार ओळखपत्र
3.ड्रायविंग लायसन्स
4.पासपोर्ट फोटो
5.शेतकऱ्याच्या जमिनीची इतर महत्वाचे कागदपत्रे

  • इत्यादी कागदपत्रे असणे अत्यंत गरजेचे आहे.त्याशिवाय आपल्याला कर्जाचा अर्ज पूर्ण करता येणार नाही.याची सर्वांनी खबरदारी घेणे खूप आवश्यक आहे.

किसान क्रेडिट कार्ड अर्ज भरण्याची पद्धत :- How to Fill Kisan Credit Card Application

किसान क्रेडिट कार्ड काढन्याचे अनेक फायदे आहे. सर्वात पहिले शेतकऱ्याला इंटरनेट वर जावे लागणार आणि तीते किसान योजनेची वेबसाईट “pmkisan.gov.in” हि साईट इंटरनेट वर सर्च करा. आणि येतुन किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाउनलोड करावे लागणार. हा फॉर्म डाउनलोड झाल्यावर तो फॉर्म शेतकऱ्यांना कृषी सहायक किंवा

कृषी अधिकारी याच्या कडून तो फॉर्म भरून जवळच्या बँकेमध्ये सबमिट करावे लागणार. आणि आवश्यक असलेली कागदपत्रे त्यासोबत जोडावी लागणार. त्यानंतर काही वेळात तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड देण्यात येते. तुम्ही कोणत्याही बँकेत जाहून हा फॉर्म भरू शकता.

किसान क्रेडिट कार्ड चे फायदे :- Benefits of Kisan Credit Card

 

Benefits of Kisan Credit Card

 

किसान क्रेडिट कार्ड बनल्यानंतर शेतकरी ९ टक्केच्या व्याजदराने ३ लाखापर्यंत कर्ज घेऊ शकेल. यासोबतच सरकारने व्याजदरावर सवलत दिलेली आहे त्यात २ टक्के सबसिटी दिली आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने वेळेपूर्वी जर कर्ज भरले तर त्यासाठी बँकेने ३ टक्के व्याज कमी करत असते. त्यामुळे शेतकऱ्याला याचा नक्की फायदा मिळत असतो. शेतकऱ्याला फक्त ४ टक्के व्याज हे बसत असते.

किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे मानले जाते कारण अनेक शेतकऱ्याला कर्जाची गरज भासत असते तेव्हा शेतकऱ्याला लवकरात लवकर कर्ज मिळत असते. शेतकऱ्याला शेतीसाठी आजूबाजूला पैसे मागण्याची गरज भासणार नाही. कधी कधी बँकेकडून व्याज सुद्धा माफ होत असतात. तर कधी कर्ज सुद्धा माफ होतात. जेव्हा दुबारपेरणीची गरज भासते तेव्हा कर्जाची गरज नक्की लागत असते असा वेळी हि योजना कामी पळू शकेल.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment