रतन टाटा यांचा जीवन परिचय :- Biography of Ratan Tata In Marathi

रतन टाटा यांचा जीवन परिचय :- Biography of Ratan Tata In Marathi:-  रतन टाटा ने जगातील सर्वात लहान कार बनवून ते प्रसिद्ध झाले. आणि हे एक अतिशय प्रसिद्ध उद्योगपती सुद्धा आहे. भारतामध्ये या व्यक्तीला खूप मान देतात. रतन टाटा हे जमशेदजी टाटा यांचे नातू आहे. ते टाटा समूहाच्या सर्वात मोठ्या भारतीय संघटनेचे माजी अध्यक्ष होते. त्यांनी प्रमुख् कंपन्या त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. त्यात टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा पॉवर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा टेली सर्व्हिसेस, आणि इंडियन हॉटेल्स.

या कंपन्या रतन टाटा यांच्या नियंत्रणात आहे. सद्य रतन टाटा टाटा समूहाच्या चारिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष बनले आहे. रतन टाटा आत्ता पर्यंत अविवाहित आहे. रतन टाटा हे अतिशय शांत स्वभावाचे आहे. आणि लाजाळू सुद्धा आहे. रतन टाटा हे उच्चं विचाराचे आणि उच्चं व्यक्तीमत्व आहे. रतन टाटा चे व्यवसायाचा अर्थ म्हणजे नफा मिळवणे नव्हे तर समाजाबद्दल आपले जबाबदारी समजून घेणे याचा अर्थ होत असतो.

रतन टाटा यांचा जीवन परिचय :- Biography of Ratan Tata

 

Biography of Ratan Tata

 

रतन टाटा यांचे बालपण आणि सुरुवातीचे काही दिवस :- Ratan Tata’s childhood and early days

रतन टाटा हा त्यांचा दत्तक घेतलेला मुलगा होता. आणि त्यांच्या आईचे नाव सोनू टाटा होते.यांचा जन्म हा २८ डिसेंबर १९३७ साली झाला रतन टाटा यांचा जन्म हा मुंबई मध्ये झाला व त्यांचे कुटुंब हे पारशी होते. नवल टाटा हे जमशेदजी टाटा यांचा धाकटा मुलगा होता.आणि नवल टाटा हे रतन ताटाचे वडील आहे . रतन हा त्यांचा दत्तक घेतलेला मुलगा होता. टाटा कंपनीचे संस्थापक हे जमशेदजी टाटा होते. रतन टाटा हे १९४८ मध्ये १० वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचा व त्यांच्या

आईचा घटस्फोट झाला नंतर त्यांचे पालन पोषण त्यांच्या आजीने केले त्यांच्या आजीचे नाव नवजबाई टाटा असे होते. रतन टाटा ने चॅम्पियन्स स्कूल मधून त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांना आर्किटेक्ट व्हायचे असल्यामुळे त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये जाऊन शिक्षण सुरु केले. त्यांना स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपले नाव टाटा हे विसरून ते आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण केले.

रतन टाटा यांनी जेव्हा काम नव्हते तेव्हा हॉटेल मध्ये भांडी घासण्यापासून त्यांनी सर्वच काम केले. ते अमेरिकेत १० वर्ष राहिले होते. त्यांचा हा प्रवास खूप खळतळ होता. १९५९ मध्ये रतन टाटा ने कॉर्नेल विद्यापीठात शिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटा यांनी १९७५ साली हॉवर्ड विद्यापिठातून माझेजमेंटची पदवी मिळविली होती.

रतन टाटा यांची व्यावसायिक कारकीर्द :- Ratan Tata’s professional career

रतन टाटा ने १९६२ साली आपली कारकीर्द सुरु केली. यांनी टाटा स्टील विभागातून सुरुवात केली. तेव्हा त्यांनी ब्लू कॉलरच्या कर्मचाऱ्यांसह भट्टीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. हे काम खूप कठीण होत. टाटा समूहाच्या रितीनुसार १९७० पर्यंत रतन टाटा यांनी बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केले होते. त्यानंतर त्यांना मॅनेजमेंट मध्ये प्रमुख सुद्धा केले. १९७१ साली त्यांची राष्टीय रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड चे संचालक म्हणून त्यांची निवड करण्यात आली होत.

त्यानंतर पुढच्या तीन वर्षांमध्ये कंपनीत खूप वाढ झाली. आणि नेल्कोचे शेअर २% वरून त्यांनी २०% पर्यंत वाढवले. परंतु देशातील आर्थिक मंदीमुळे नेल्को कंपनीला बंद करावे लागले. हे अपयश रतन टाटा च्या जिवनातील सर्वात मोठे अपयश होते. १९७५ मध्ये हॉवर्ड विद्यापीठातून त्यांनी मॅनेजमेंटची पदवी मिळविली होती त्यावेळी टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख हे JRD टाटा हे होते. तेव्हा त्यांच्या सोबत भेट झाली होती.

त्यानंतर १९७७ मध्ये त्यांच्या वर इंप्रेस मिल ची जबाबदारी दिली होती. ती बंद होण्याच्या मार्गावर होती. त्यांनी तेव्हा गिरणीसाठी आराखडा तयार केला पण अन्य अधिकाऱ्यांनि त्यांना नकार दिला होता त्यामुळे पुन्हा ती कंपनी बंद झाली. रतन टाटा ला दुसऱ्यांदा हे मोठे अपयश आले होते पण या कामात त्यांना बरेच काही शिकायला मिळाले होते.

रतन टाटा ने विकत घेतलेल्या JAGUAR आणि LAND ROVER :- JAGUAR and LAND ROVER purchased by Ratan Tata

१९८१ साली रतन टाटा ला टाटा इंडस्ट्री चे अध्यक्ष बनविण्यात आले. त्यानंतर १९९१ साली JRD टाटा यांनी त्यांना टाटा समूहाचे नवे चेयरमन म्हणून नियुक्त केले होते. यानंतर टाटा संघूहात खूप वाढ झाली. पहिलेच हे कंपनी वाहन तयार करत होती परंतु रतन टाटा ला वाटले कि सामान्य जनतेची समस्या बघून त्यांनी ३० डिसेम्बर १९९८ मध्ये इंडिका कार ही बाजारामध्ये आणली. रतन टाटा यांनी हे कार बाजारात आणण्यासाठी खूप मेहनत केली होती. पण अटोमोबाइल ऍनेलिसिस ने या गाडीतील काही डोसघ काढले त्यामुळे त्यांच्या गाडीच्या विक्रीवर काही प्रमाणात परिणाम झाला.

यामुळे एका वर्षातच तो फ्लॉप झाला तयामुळे टाटा मोटर्स ला खूप तोटा झाला. त्यानंतर त्यांना कार कंपनी विकण्याचा निर्णय घेतला होता. FORD कंपनीचे चेयरमन बिल फोर्ड यांनी रतन टाटांचा खूप अपमान केला. जर तुम्हाला कार बनवता येत नसेल तर कशाला बनवावी व या व्यवसायात कशाला आले? याचा रतन टाटाला खूप राग आला त्यांनी सर्व संपत्ती या कामात गुंतविली. त्यानंतर रतन टाटा नि टाटा इंडिका V२ ही कार बाजारमध्ये आणली. या चारमुळे टाटा मोटर काही प्रमाणात आपले नाव वर केले. त्याच वेळी FORD कंपनी आपल्या JAGUAR आणि LAND ROVER मुळे ही कंपनी बंद होण्याचा मार्गावर होती त्यावेळी

२००८ साली रतन टाटा ने JAGUAR आणि LAND ROVER विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला. FORD कंपनीकडे हा प्रस्ताव ठेवला हा प्रस्ताव आनंदाने स्वीकार केला. रतन टाटा यांना बिल फोर्ड यांनी म्हंटले कि हे कंपनी विकत घेऊन तुम्ही आमच्यावर खूप उपकार करत आहात. यावेळी टाटा त्यांचा अपमान करू शकले असते पण हाच फरक आहे यशस्वी आणि महान व्यक्तीमध्ये वेगळेपण असल्याचा. जे इतरांपासून वेगळे बनविन्याचे काम केले. रतन टाटा हे यशस्वी व्यक्ती आहे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment