Bounce Infinity E1 Electric Scooty Launched Price, Specification In Marathi:- बाऊन्स कंपनीने पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाऊन्स इन्फिनिटी ई-1 बाजारात लाँच केली आहे. विशेष म्हणजे कंपनीने ही स्कूटर बॅटरीसह आणि बॅटरीशिवाय विकत घेण्याचा पर्याय लोकांना दिलेला आहे .
Bounce Infinity E1 Electric Scooty Launched Price, Specification
बॅटरीशिवाय हि स्कूटर खरेदी करण्यासाठी ‘Battery as a service’ असा पर्याय तुमच्याकडे आहे. ईव्हीसाठी ग्राहकांना अशाप्रकारचा सोयीस्कर पर्याय देणारी बाऊन्स देशातली पहिलीच कंपनी ठरलेली आहे . हे स्कूटर दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे या स्कूटर मध्ये अनेक फीचर्स सुद्धा दिलेले आहे.
या पर्यायामुळे, बॅटरी नसलेली इलेक्ट्रिक स्कूटर, बॅटरीने सुसज्ज असलेल्या स्कूटरपेक्षा ४० टक्क्यांनी स्वस्त झालीये.ही ‘मेड इन इंडिया’ इन्फिनिटी इलेक्ट्रिक स्कूटर टॉप स्पीड आणि ड्रायव्हिंग रेंजच्या बाबतीत शानदार Scooty आहे, शिवाय या स्कूटर चे आकर्षक लूक आणि लेटेस्ट फीचर्ससह तयार आहे. बाऊन्स कंपनीने फक्त ४९९ रुपयात Infinity E1 साठी प्री – बुकिंग सुरूवात केली आहे.
अनेक लोकांना याचा खूप फायदा मिळणार आहे. या स्कूटर मध्ये ५ रंग दिलेले आहे. या स्कूटर मध्ये स्पोर्टी रेड ,स्पार्कल ब्लॅक, कॉमेड ग्रे आणि पर्ल व्हाईट असे रंग या स्कूटर मध्ये दिलेले आहे. यात स्पोर्टी रेड हा रंग खूप सुंदर दिसत आहे. या EV स्कूटर ला फुल चार्जिंग होण्यासाठी ४ ते ५ तास लागत असतात. बॅटरी कुठल्या पण सॉकेट मध्ये लावून चार्जिंग करू शकता.
या स्कूटर ची बॅटरी फुल झाली तर ती ८५ किलोमीटर चालू शकते. आणि या Scooty ची टॉप स्पीड हि ६५ किमी प्रतितास आहे. या स्कूटर ची एक खासियत आहे कि तुम्ही या स्कूटर ची बॅटरी काढून सुद्धा हि स्कूटर विकत घेता येतात. आणि बॅटरी काढून चार्जिंग सुद्धा करता येतात. या स्कूटर मध्ये अनेक फिचर्ज दिलेले आहे. यात Led प्रोजेक्टर हेडलॅप , LED हेडलाईट , बूट स्पेस आणि डिझिटल स्पीड मीटर , जिओफेन्सीस ,टो अलर्ट ,ड्रॅग मोड इत्यादी फीचर्स इन्फिनिटी ई – १ स्कूटर मध्ये दिलेलं आहे.
या सोबतच या स्कूटर चा REVIEW सुद्धा खूप चांगला आहे. हि स्कूटर बिना बॅटरी ने सुद्धा विकतात आणि बॅटरी सोबत सुद्धा विकत असतात. या स्कूटर मध्ये दोन प्रकारच्या किमती आहे. याची किंमत माहिती करायची असल्यास ऑनलाईन अँप वर सुद्धा मिळणार. नाही तर त्याच्या शोरूम मध्ये सुद्धा याची संपूर्ण माहिती मिळणार.