ताडोबा अंधेरी नॅशनल पार्क बद्दल संपूर्ण माहिती: Complete information about Tadoba Andheri National Park In Marathi:- भारतात अनेक राष्ट्रीय उद्यान आहेत. आणि त्यात खूप जास्त प्रमाणात प्राणी सुद्धा आहेत. भारतात वाघांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे. आणि ताडोबा हे सुद्धा त्यांच्या साठीच खूप जास्त प्रसिद्ध आहे. आणि यात सुद्धा खूप जास्त वयस्कर वाघ आहे. आणि त्यात खूप जास्त वाघ त्यात आहेत.
ताडोबा अंधेरी नॅशनल पार्क बद्दल संपूर्ण माहिती: Complete information about Tadoba Andheri National Park
भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध अभयारण्यात ताडोबाची गणना केली जाते. ताडोबा राष्ट्रीय उद्यानात वेगेवेगळ्या प्रकारचे अनेक वन्यजीव आढळून येतात. ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या विदर्भात असलेल्या चंद्रपूर जिल्यात आहे. या उद्यानाला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.
त्यात मोठं मोठे कलाकार , उद्योगपती आणि त्याच सोबत विदेशी पर्यटक सुद्धा येथील प्राण्यांना भेट देण्यासाठी येत असतात. ताडोबा अंधारी प्रकल्प हा १७२७ चौ. कि. मी. च्या परिसरात पसरलेला आहे. हे मोठे उद्यान वन्यजीव आणि वनस्पतीचा मोठा खजिना आहे. आपल्याला यात अनेक प्रकारचे वेग वेगळे वन्यजीव आणि काही दुर्मिळ वनस्पती सुद्धा आढळून येतात.
अनेक लोक येथील निसर्गरम्य वातावरणात फिरायला सुद्धा येत असतात. इथले निसर्ग खूप सुंदर आहे. यात बरच प्राणी आढळून येतात, जसे वाघ, रानडुक्कर, पँथर,हरीण, मोर, आणि अनेक वेगवेगळ्या जातीचे पक्षी इत्यादी प्रकारचे पक्षी आणि प्राणी आढळून येत असतात.
ताडोबा प्रकल्पामध्ये खूप जास्त प्रमाणात वाघांची संख्या वाढत आहे आणि त्यामुळे तेथील परिसर त्यांच्या साठी खूप जास्त अपुरा पडत आहे. जे लोक वाघ बघण्यासाठी येत असतात. त्या लोकांना आता खूप लवकर वाघाची भेट होत आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील जीवन सृष्टी सस्तन प्राण्यांपासून सरपटणाऱ्या प्राण्यांपर्यंत, अनेक प्रकारच्या पक्षापासून ते फुलपाखरापर्यंत जीवसृष्टी येथे आहे.
येथे सुमारे १५० पेक्षा जास्त बंगाल वाघ राहत असतात. याठिकाणी पर्यटकांना राहण्यासाठी खूप चांगली सोया आहे. त्यामुळे येथे अनेक पर्यटक खूप दिवसाच्या मुक्कामाने सुद्धा असतात. या उद्यानात वाघाची संख्या खूप जास्त वाढल्यामुळे या उद्यानाला वाघाची भूमी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे भारतात मोठं मोठ्या वाघ्यप्रकल्पात या अभयारण्याची ओळख आहे. मार्श क्रोकोडाईल हा एक पाण्याचा प्राणी आहे.
एकेकाळी तो महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आढळून येत होता परंतु आता त्याच्या लोकसंख्येत मोठी घट झाल्यामुळे आता तो प्राणी ताडोबा राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. प्राण्यांच्या साम्राज्याच्या विविध प्रजाती आहे. त्यामुळे ताडोबामध्ये अनेकी प्रकारचे सरपटणारे प्राणी दिसत आहे.
यात इंडियन कोब्रा, इंडियन पायथन, बंगाल मॅनिटॉर, इंडियन स्टार कासव इत्यादी प्रकारचे अनेक प्राणी या ताडोबा संग्रहालयामध्ये आढळून आले आहे. ताडोबाने पर्यटकांचे दृश्य संस्मरणीय बनण्यासाठीच आत्तापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे त्यामुळे अनेक पर्यटक या संग्रहालयाची कौतुक करतात.
ताडोबामध्ये अनेक प्रकारची अनेक प्रकारची वेगवेगल्या प्रजातीची झाडे आहे यामध्ये सेमल, क्रोकोडाईल बार्क, तेंदू, बीजा, सेलाई इत्यादी प्रकारची झाडे आपल्याला ताडोबा उद्यानात आढळून येतील आणि हे जंगल खूप दात आहे. या जंगलात सर्वात जास्त हरीण आणि रान कोंबडी दिसून येतात. येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक वाहने सुद्धा आहेत. यामध्ये फिरण्यासाठी अनेक वेगवेगळे रस्ते आहेत.
आणि या रस्त्याचे विभाजन केले आहे. या अभ्य्राण्यात फिरण्यासाठी सफारी आणि बस हे दोन वाहन असतात. हे पर्यटक स्थळ पावसाळ्यामध्ये बंद असते. ताडोबामध्ये राष्ट्रीय उद्यानात जीप सफारी सुविधेने निसर्गाचे जवळून दर्शन होणे शक्य आहे. हे ताडोबा प्रकल्प फक्त उन्हाळा आणि हिवाळा या हंगामातच सुरु असते. जीप सफारीसाठी एकूण ४ पॅकेज पुलब्ध असते आणि सकाळी आणि दुपारच्या शिफ्टसाठी सफारी सुरु असतात.
ताडोबामध्ये फिरण्यासाठी तेथील बुकिंग करणे खूप आवश्यक आहे. आपल्याला तिथे स्वतःच्या गाडीने फिरण्यासाठी परवानगी नाही. जर तुम्हाला ताडोबाचे मुख्य दर्शन घायचे असेल तर तिथला मुख्य काळ हा उन्हाळा असतो. त्यामध्ये मार्च ते जून महिन्यामध्ये खूप जास्त संख्येत पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. कारण तेव्हा तिथे जास्त प्रमाणात वाघ दिसत असतात.
कारण ते पाण्याच्या ठिकाणी वाघ पाणी पिण्यासाठी येत असतो त्यावेळी अनेक पर्यटक त्याला बघू शकतात. त्यावेळी अनेक पर्यटक आपल्या कॅमेरात त्याचे सुंदर दृश्य घेत असतात. याठिकाणी आपण एकदा गाडीवर बसलो कि आपल्याला आपली सफारी संपल्यानंतरच त्याहून खाली उतरता येते. सफारी दरम्यान आपल्या वाहनावरून खाली उतरण्यास सक्त मनाई आहे.
याठिकाणी तापमान खूप जास्त असल्यामुळे आपल्या सोबत आपली स्वतःची पाण्याची सोय असणे खूप आवश्यक आहे. याठिकाणी काही स्टॉप बनवलेले आहेत केवळ त्याठिकाणीच आपल्याला थांबण्याची परवानगी आहे. ताडोबामध्ये भेटीसाठी योग्य दुसरा हंगाम म्हणजे हिवाळा आहे. तो म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये अनेक पर्यटक या ठिकाणी फिरायला येत असतात.
त्या महिन्यात पर्यटकाला लहान मोठे प्राणी आणि अनके प्रकारचे पक्षी पाहण्याची संधी मिळत असते. ताडोबा हे उद्यान पावसाळ्यामध्ये पर्यटकांसाठी बंद असते. येथे फिरण्यासाठी जायचे असल्यास त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला असणे खूप गरजेचे आहे.