बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेबद्दल संपूर्ण माहिती :- Complete information about Beti Bachao Beti Padhao Yojana In Marathi

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेबद्दल संपूर्ण माहिती :- Complete information about Beti Bachao Beti Padhao Yojana In Marathi:- बेटी बचाओ बेटी पढाओ हि योजना भारत सरकारद्वारे मुलींच्या भविष्याकरिता सुरु करण्यात आली आहे . बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान भारत सरकारचे आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ हि योजना मुलींच्या कल्याणाकरिता २२ जानेवारी २०१५ मध्ये सुरु करण्यात आली.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेबद्दल संपूर्ण माहिती :- Complete information about Beti Bachao Beti Padhao Yojana

 

Complete information about Beti Bachao Beti Padhao Yojana

 

आणि हि योजना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुरु केली. बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणजेच मुली वाचवा आणि मुली शिकवा.आणि हि योजना प्रामुख्याने उत्तर प्रदेश,हरियाणा, उत्तराखंड,पंजाब, बिहार आणि दिल्लीमधील समूहांना लक्ष्य करते. या योजनेद्वारे मुलीचे अस्तित्व, सुरक्षितता आणि शिक्षण सुनिश्चित केले जाईल. या योजनेमुळे माध्यमातून लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठीही प्रयत्न केले जातील. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना संपूर्ण आयुष्यभर बाल लिंग गुणोत्तरातील घाट रोखण्यास मदत होते.

या योजनेमुळे मुलींच्या संख्येमध्ये वाढ होण्यास नक्कीच मदत होईल. आणि मुलींच्या साक्षरते मध्ये सुद्धा वाढ होण्यास मदत होईल. हि योजना मुलींच्या भविष्यासाठी खूप उपयोगात आहे. हि योजना महिलांच्या कल्याणाकरिता खूप उपयोगात येऊ शकते. हि योजना महिला आणि बाल विकास मंत्रालय,आरोग्य,कुटुंब कल्याण मंत्रालय आणि मानव संसाधन मंत्रालय या तीन मंत्रालयाद्वारे राबविण्यात येत आहे.

या योजनेची सुरुवात माननीय पंतप्रधाणांनी २२ जानेवारी २०१५ रोजी पानिपत,हरियाणा येथे सुरुवात केली. या योजनेचा उद्देश असा आहे कि, मुलींचे शोषणापासून संरक्षण करणे आणि त्यांना योग्य/अयोग्यतेची जाणीव करून देणे . या योजनेमुळे मुलींना उच्च शिक्षण घेण्यास मदत होईल. या योजनेमुळे मुलींना स्वतंत्रपणे आयुष्य जगता येणार. त्यांना त्याच उच्च शिक्षण पूर्ण करण्यास मद्दत होईल आणि त्यांना त्यांच ध्येय गाठता येईल.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेमुळे मुलींच्या संख्येत जी घट पाहायला येत होती ती या योजनेमुळे नक्कीच भरून निघणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मुलींना शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करणे हा आहे. लोकांना याची जाणीव करून देणे आणि महिलांसाठी कल्याणकारी सेवांचे वितरण सुधारणे.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे उद्देश:- Objectives of Beti Bachao Beti Padhao Yojana

१. मुलींचे लिंग गुणोत्तर सुधारणे.

२. मुलींचे अस्तित्व आणि संरक्षण सुनिश्चित करणे.

३. मुलींचे शिक्षण आणि सहभागाला प्रोत्साहन देणे.

४. स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरण करणे.

५. महिलांचे स्वतंत्र

६. महिला साक्षरता

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी अर्ज कसा करावा? :- How to Apply for Beti Bachao Beti Padhao Scheme?

सर्वप्रथम अर्जदाराला महिला आणि बाळ विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

यांनतर तुमच्यासमोर पुढील पेज उघडेल, या पेजवर तुम्हाला बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेवर क्लिक करावे.

त्यांनतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यावर दिलेली सविस्तर माहिती वाचावी आणि नमूद केल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया सुरु करावी.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात येणारे लक्ष:- Focus to be completed under Beti Bachao Beti Padhao Yojana

१. एका वर्षात मुलींची संख्या दुप्पट करणे.

२. निवडलेल्या जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वच्छतागृहे निर्माण करून देणे.

३. संस्थात्मक प्रसूती दार वर्षी किमान १.५ % ने वाढवणे.

४. मुलींच्या साक्षरतेत वाढ करणे.

५. महिलांचे शोषणपासून संरक्षण करणे.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे फायदे :- Benefits of Beti Bachao Beti Padhao Yojana

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत भ्रूणहत्या बंद होण्यास मदत होते. याशिवाय मुलीचे अस्तित्व आणि सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल. या योजनेमुळे मुलींच्या साक्षरतेच्या वाढ होण्यास मदत होते. या माध्यमातून लिंग गुणोत्तरामध्ये वाढ होण्यास मदत होते. हि योजना सरकारने २०१५ मध्ये केवळ १०० जिल्ह्यामध्ये सुरु झाली . २०१६ मध्ये त्यात आणखी ६४ जिल्हे ऍड करण्यात आले.

या योजनेमुळे मुलींचे जीवनमान उंचावेल आणि भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होते. या योजनेमुळे मुलींच्या साक्षरतेमध्ये वाढ होण्यास मदत होते.बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचं नाव बदलवून आता बेटी आपकी धनलक्ष्मी आणि विजयलक्ष्मी असे करण्यात आले. या योजनेमुळे मुलींच्या शिक्षण आणि सहभागाला प्रोत्साहन मिळेल. या योजनेमुळे मुलींना उच्च शिक्षण घेण्यास मदत होईल.

आणि शिक्षण क्षेत्रात नाव कमविण्याची संधी मिळायला मदत होईल. यामुळे मुलींना निश्चितच आपले ध्येय गाठण्यात मदत होईल. बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचे अनेक सकारात्मक परिणाम मिळालेले आहे आणि शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या वाढू लागली. मुलींचे संरक्षण अस्तित्व आणि सक्षमीकरण सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या मुलींच्या प्रतिष्ठेला फायदा होईल.या योजनेमध्ये महिलांना रोजगाराच्या संधी मिळाली आहेत .

या योजनेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे. आणि या योजनेमुळे महिला सक्षमीकरणास मदत होईल. या योजनेचा महिलांना नक्कीच फायदा होईल. सरकारच्या या नवीन उपक्रमामुळे अनेक मुलींना आणि महिलांना फायदा होतो आहे त्यामुळे अनेक मुली आणि महिला प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कमवत आहे.

आजच्या काळात महिला या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे. म्हणजेच महिला नक्कीच या योजनेचा लाभ घेत आहे हे सिद्ध झालं आहे. आणि सरकारचा बेटी बचाओ बेटी पढाओ हा उपक्रम नक्कीच यशस्विरीत्या पार पडत आहे. या योजनेला महिलांकडून खूप प्रतिसाद येत आहे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment