Dhanashree Verma Biography, Net Worth, Family, Age, Husband In Marathi

Dhanashree Verma Biography, Net Worth, Family, Age, Husband In Marathi:-  धनश्री वर्मा हि एक भारतीय नुत्यदिग्दर्शक, नुंत्यागना आणि ती दंतचिकित्सक सुद्धा आहे. आणि तीचा जन्म २७ सप्टेंबर १९९६ रोजी झाला होता. आणि तिचे २०२२ चे वय हे २५ वर्षे इतके आहे. धनश्री चा जन्म दुबई मध्ये झाला. धनश्री वर्मा हि मुंबई, महाराष्ट्र, भारत येथील एका क्षत्रिय कुटुंबातील आहे.

Dhanashree Verma Biography, Net Worth, Family, Age, Husband

 

Dhanashree Verma Biography, Net Worth, Family, Age, Husband

 

आणि तिच्या वडिलांचे नाव कपिल वर्मा असून ते व्यवसायाने एक व्यापारी आहे. आणि तिच्या आईचे नाव वर्षा वर्मा असून ती एक गृहिणी आहे. आणि तिला एक भाऊ सुद्धा आहे. आणि तिने शालेय शिक्षण हे मूंबईमधील जमनाबाई नरसी स्कूल मधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि ती त्यानंतर डिवाय पाटील विद्यापीठ मधून दंतचिकित्सक हा कोर्स केला. तिचे टोपण नाव धना असे आहे.

धनश्रीच्या वडिलांनी लहानपणापासूनच तिला कशाचीच कमतरता भासू दिली नाही. धनश्रीला लहानपणापासूनच डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते आणि सोबत नृत्याचाही छंद होता. आणि यात तिला तिच्या कुटुंबाने खूप साथ दिली. धनश्री तिच्या अभ्यासासोबतच नृत्य सुद्धा करत होती,जेव्हा शाळा किंवा कॉलेज मध्ये स्पर्धा व्हायच्या त्यामध्ये ती नक्की भाग घेत असे.

आणि एक चांगली नृत्यांगना बनण्याची तिची इच्छा जेव्हा ती “कोई मिल गया” या चित्रपटाची शूटिंग चालू होती तेव्हा तिने ह्रितिक रोशन चा डान्स बघितला तेव्हा तिला वाटू लागले कि मला पण नृत्यांगणा व्हायचे आहे त्यांनतर तिने शामक दावर यांच्या कडून तिने नृत्याचे प्रशिक्षण घेणे सुरु केले. शामक दावर हा धनश्री वर्मा चा दीर्घकाळ गुरु होते.

त्याने धनश्री ला नृत्याचे अनेक प्रकार शिकवले.तिची डान्स ची आवड बघितल्यावर तिला आई वडिलांनी खूप पाठिंबा दिला. ति नृत्याच्या एवढी प्रेमात पडली कि, ती परीक्षेच्या वेळी सुद्धा डान्स करायची त्यामुळे तिच्या आई वडिलांनी नृत्य थांबवून अभ्यास करण्यासाठी भाग पाडले. त्यांनतर तिने नृत्यामध्ये करिअर केले.

Dhanashree Varma’s Career

 

Dhanashree Varma's Career

 

धनश्री वर्माचा मुख्य व्यवसाय दंतचिकित्सक आहे. तिने मुंबई डेण्टिसिमो डेंटल केअर आणि स्पा चा सराव करून करिअर ची सुरुवात केली. आणि तिने डिवाय येथे इंटर्न म्हणून सुद्धा काम केले. पाटील इन्स्टिटयूट मुंबई येथे ती एक अप्रतिम डान्सर आणि कोरिओग्राफर सुद्धा आहे. आणि तिने २०१५ मध्ये तिचे यूट्यूब चॅनेल सुरु केले आणि गुरु रंधावा, आस्था गिल, आदिल खान,आणि प्रियांक शर्मा यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. यूट्यूब चॅनेल वर खूप कमी वेळात मोठ्या संख्येने चाहते मिळवले आहे. तिच्या बहुतेक विडिओ ला लाखो लाईक्स आहे. अलीकडेच तिला १ दशलक्ष सबस्क्रायबर मिळविण्यासाठी यूट्यूब ने गोल्डन प्ले बटण मिळाले आहे. तिच्या सोशल मीडिया वर खूप फॅन्स फॉलोव्हर खूप मोठे आहे, तिचे इंस्टाग्रामवर ४.८ दशलक्ष पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. आणि तिच्या यूट्यूब चॅनेलवर २.६१ दशलक्ष सदस्य आहेत.

धनश्री वर्मा हि एक आकर्षक व्यक्तिमत्व आहे. तिची उंची ५ फूट ६ इंच आहे,आणि तिचे वजन ५६ किलो आहे. तिचे डोळे तपकिरी रंगाचे असून तिच्या केसांचा रंग काळा असून तिचे केस सुंदर आणि लांब सुद्धा आहे. तिच्या अंगावर एक सुद्धा टॅटू नाही आहे. तिची एकूण संपत्ती हि $३ दशलक्ष आहे. तिने युझवेन्द्र चहल ला खूप दिवस डेट केले आहे त्यांनतर त्यांनी त्यांचे नाते सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला, आणि ८ ऑगस्ट २०२० रोजी त्यांनी सोशल मीडिया वर एंगेजमेंट चे फोटो शेअर केले आणि तिने २२ डिसेम्बर २०२० रोजी भारतीय क्रिकेटपटू युझवेन्द्र चहल सोबत लग्न केले. धनश्री वर्मा हि एक पाळीव प्रेमी असून तिच्याकडे एक पाळीव कुत्रा आहे. तिला गाणे आणि डान्स शो बघणे खूप आवडते. तिचा आवडता अभिनेता ह्रितिक रोशन आणि सलमान खान हे आहे.आणि धनश्री ची आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित आहे. आणि तिचा आवडता रंग गुलाबी आणि सफेद आहे. आणि तिची आवडती डिश पाणीपुरी आहे. आणि तीचा आवडता खेळ क्रिकेट आहे. आणि धनश्री चे आवडते खेळाडू हे युझवेन्द्र चहल, विराट कोहली, एबी डिव्हिलिअर्स आहेत.

Dhanashree Varma Networth

 

Dhanashree Varma Networth

 

 

धनश्री वर्माचे २०२२ पर्यंत ची एकूण संपत्ती सुमारे $२.५ दशलक्ष किंवा भारतीय रुपयांमध्ये १९ कोटी असल्याचा अंदाज आहे. ती प्रामुख्याने नृत्य दिग्दर्शन, नृत्य करिअर, यूट्यूब, जाहिराती,ब्रँड,आणि इतर माध्यमातून हि सर्व कमाई केली आहे. धनश्री वर्मा ने यूट्यूब वरून खूप कमाई केली आहे. आणि ती एका जाहिरातीला ४-५ लाख रुपये घेते. आणि डान्स कोरिओग्राफी वर सुद्धा ती मोठी कमाई करते.

Dhanashee Varma’s Car Collections

  • Rolls-Royce
  • Porsche Cayenne S
  • Lamborghini

Dhanashree Varma’s Famous You-Tube Video’s

१. Chogada Taara

२. Dheere Dheere

३. Bom Diggy

 

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment