हिमालयात पोहोचतंय नळाने पिण्याचं पाणी:- Drinking tap water reaching the Himalayas In Marathi:- हिमालय या पर्वताला तर आपण सर्वच ओळखत असाल. जगातील सर्वात उंच शिखरांची किंवा पर्वतांची गणना केली तर त्यात हिमालय पर्वत नेहमी पहिल्या कर्मणकावर असते. हे पर्वत त्याच्या उंचीने सर्व जगभर प्रसिद्ध आहे. लेह शहरापासून तब्ब्ल ४ तास डोंगराळ रस्त्याने प्रवास केल्या नंतर एक नीडल नावाचं गाव येत आणि हिमालयाच्या उंच डोंगरातून या गावी लोकांना पिण्यासाठी पाणी
हिमालयात पोहोचतंय नळाने पिण्याचं पाणी:- Drinking tap water reaching the Himalayas
कशा प्रकारे पाठविल्या जाते आणि त्याच्या मागचे कारण किंवा तत्व काय असेल हा प्रश्न खूप लोकांना पडला आहे. परंतु आपल्यातील खूप कमी लोकांना याचा विचार आला असेल तर आपण त्याबद्दलच थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. या गावी पिण्याच्या पाण्यासाठी सलग तीन दिवसानानंतर गावात पाण्याचं टँकर येत असतं आणि येथील लोकांना तीन दिवसापर्यंतच पाणी आधी साठवून ठेवावं लागत असत.
याठिकाणी पिण्याला किंवा वापरला पुरेपूर पाणी नसल्याने या ठिकाणी पाण्याच्या टँकरची सुविधा दिली जाते. अशा ठिकाणी खूपदा टँकर येण्याच्या रस्त्यावर काही पडलेलं असता आणि त्याठिकाणीच रास्ता बंद होत असते आणि अशा वेळी त्या गावात टँकर वेळेत पोहोचू शकत नाही. आणि अशा वेळी येथील लोकांना हिमालयातून येऊन वितळणाऱ्या पाण्याच्या वापर त्यांना त्याच्या घरात पिण्यासाठी किंवा इतर बाहेरील वापरासाठी करावा लागतो.
आणि अशा वेळी त्यांना खूप समस्यांचा सामान करावा लागतो. कारण गावावरून एखाद्या नाल्याचे अंतर खूप जास्त असले तर त्यांना पाणी आणण्यासाठी खूप त्रास होत असतो आणि अशावेळी टँकर आले तर त्यांची समस्या काही प्रमाणात कमी होत असते. परंतु सध्याच्या काळात काही योजना अंतर्गत या गावात नळाचं पाणी आणल्या जात आहे.
काही वेळी येथील लोक सांगत असतात कि जर त्यांनी त्यांच्या वापरासाठी पाणी आणलं आणि त्याला जर त्यांनी त्यांच्या घराच्या बाहेर किंवा कोणत्याही ठिकाणी ठेवलं तर त्याच्या त्या पाण्याच्या बर्फ बनण्यास सुरुवात होते आणि जेव्हा पर्यंत ते पाणी त्यांच्या वापरता येणार तेव्हा पर्यंत त्या पाण्याचा पूर्णपणे बर्फ बनून तयार होणार. आणि त्यानंतर ते त्यांच्या कोणत्याही वापरात येणार नाही.
त्यासाठी तेथील लोक त्यांना गरजेचे त्याच प्रमाणात पाणी आणतात आणि त्याचा वापर करत असतात. याठीकानी पाण्यापासून बर्फ होण्याची प्रक्रिया नेहमी सुरु असते आणि यामुळे त्यांना खूप त्रास होत असते त्यासाठी ज्याठिकाणी आता नळ लावले आहे त्याठिकाणी त्यांना थर्मल कोटिंग सुद्धा केली आहे जेणेकरून पाण्याचा बर्फ होऊ नये आणि पाणी द्रव रूपातच राहायला हवं.
याठिकाणी तापमान खूप कमी असल्याने पाणी सतत गोठत असता आणि त्यासाठी जे नवीन नळ सुविधा तयार करत आहे त्यासाठी पाण्याचे पाईप मैदानी प्रदेशाच्या तुलनेत दुप्पट खोदकाम करून त्यानंतर तेथे पाईप लाईन टाकत आहे. आणि हिवाळ्यात याठिकाणी तापमान शून्य डिग्री पेक्षाही खाली असते आणि त्यामुळे टॅंक मध्ये साठवून ठवलेलं पाणी सहजपणे गोठत असते आणि असे होऊ नये यासाठी येथे अंडरग्राउंड पाण्याची टॅंक तयार करण्यात आली आहे. म्हणजेच पाण्याची टॅंक जमिनीच्या काही प्रमाणात खाली खोदकाम करून बांधण्यात आली आहे. आणि त्यानंतर येथून गावातील लोकांना चांगली आणि स्वच पाण्याचा आस्वाद घेता येणार आहे.