Family Health Insurance Policy In Marathi:- आपल्या सर्वांना कौटुंबिक आरोग्य विमा योजने बद्दल माहिती असेलच, आजच्या काळात कौटुंबिक आरोग्य विमा योजना खूप आवश्यक आहे . कुटुंब हि प्रत्येकाच्या जीवनातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि लोक त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी काहीही करतील.
Family Health Insurance Policy
कौटुंबिक आरोग्य विमा योजना हा एक प्रकारचा वैद्यकीय विमा आहे जो तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना एकाच आरोग्य विमा पॉलिसी मध्ये कव्हर करतो . कौटुंबिक आरोग्य विमा संपूर्ण कुटुंबासाठी खूप फायदेशीर आहे ज्या मध्ये समान विमा रक्क्म कुटुंबातील सर्व सदस्याद्वारे जमा केली जाते . कौटुंबिक आरोग्य विमा योजनेचा उद्देश एका कुटुंबाला सुरक्षित करणे आहे या योजने मध्ये विमा संरक्षण एका कुटुंबासाठी विस्तारित केले जाते .
उदाहरणार्थ,तुम्ही तुमच्या कुंबासाठी आरोग्य योजना विकत घेतल्यास,तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी दावा करण्यास सक्षम असाल. जसे,दवाखान्याचा खर्च,रुग्णवाहिकेचा खर्च,शस्त्रक्रियेचा खर्च,औषधांचा खर्च इ.खर्चाच्या उपयोगात हा आरोग्य विमा महत्वाचा आहे.
Benefits of Family Health Insurance :
१. संपूर्ण कुटुंबासाठी कव्हरेज:
कौटुंबिक आरोग्य विमा योजना कुटुंबासाठी खूप महत्वाची आहे. या योजने अंतर्गत कुटुंबातील सर्व सदस्यांना कव्हर करता येते. जसे कि तुमची मुले, तुमचे पालक, तुमचा जोडीदार, तुम्ही स्वतःला आणि तुमच्या सासू सासऱ्यांना देखील कव्हर करू करू शकता. आणि काही काही योजना या अशा आहेत कि,ज्या तुमच्या विस्तारित कुटुंबाला देखील कव्हर करण्याची परवानगी देत आहे.
२. प्रत्येक कव्हर केलेल्या सदस्याला उच्च कव्हरेज :
कौटुंबिक आरोग्य विमा योजनेतील रक्कम कुटुंबातील आजारी पडलेल्या कोणत्याही सदस्याला पूर्णपणे वापरली जाऊ शकते.कौटुंबिक आरोग्य विमा योजनेचा लाभ कुटुंबातील प्रत्येक सदस्य घेऊ शकते.
३. कौटुंबिक आरोग्य योजनांतर्गत मातृत्व कव्हरेज ला परवानगी :
भविष्यात कुटुंब सुरु करणाऱ्या तरुण जोडप्यांसाठी, मातृत्व कव्हरेज असलेल्या कौटुंबिक आरोग्य विमा योजना हा एक चांगला पर्याय आहे. हि योजना मातृत्वा संबंधित खर्चासाठी कव्हरेज देतात. कौटुंबिक आरोग्य विमा योजना हि मातृत्वाची खूप फायदेशीर आहे.
४. सर्वसमावेशक कव्हर ची निवड :
कौटुंबिक आरोग्य विमा योजना वेगवेगळ्या फायद्यांसह येतात आणि तुम्ही तुलना करून त्यातील एक योजना तुम्ही निवडू शकता ज्या मध्ये सर्वात समावेशक कव्हरेज ची वैशिष्ट्ये आहे. तुम्ही असे केल्यावर, तुमचे कुटुंब संपूर्ण कव्हरेज चा फायदा घेऊ शकता आणि प्रत्येक मोठा वैद्यकीय खर्च या योजनेत समाविष्ट केला जाईल आणि हे जाणून तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल.
५. नवीन सदस्य सहज जोडता येतात :
कौटुंबिक आरोग्य विमा योजना तुमाला नवीन सदस्य जोडण्याची परवानगी देते. तुमच्या कुटूंबात नवीन सदस्य जन्मास आल्यास तुमची पॉलिसिच्या अटी आणि शर्तीवर औलंबून, पॉलिसि मुदतीच्या मध्यावर नवीन सदस्यासाठी कव्हरेज सहज पने मिळवू शकतात.
Best Family Health Insurance Plans in India :
१. आदित्य बिर्ला ऍक्टिव्ह हेल्थ प्लॅन :
आदित्य बिर्ला हि भारतातील हि उच्च विमा कंपन्यांमधून एक विमा कंपनी आहे. हि विमा कंपनी कुटुंबासाठी विशेष योजना ऑफर करते या योजनेत २ लाख- २ कोटी विम्याच्या रकमेचे पर्याय आहे.या पॉलीसी मध्ये समाविष्ट असलेल्या काही वैशिट्यामध्ये रुग्णांना रुग्णालयात भरती करणे,६० दिवसांच्या कालावधीसह प्री-हॉस्पिटलायजेशन,१८० दिवसाच्या कालावधीसह दवाखान्यात दाखल झाल्यांनतर,उपचार खर्च,रुग्णवाहिकेचा खर्च, अवयव दानाचा खर्च, आरोग्य तपासणी खर्च,यांचा समावेश आहे.
२. अंकीय कुटुंब आरोग्य विमा योजना :
अंक हि एक नावाजलेली विमा कंपनी आहे जी २ लाख -२५ लाख विम्याची रक्क्म निवडण्याची मोभा देते. या पॉलिसि मध्ये अपघाती दवाखान्याची विम्याची रक्कम, वार्षिक तपासणी, रुग्ण वाहिका कव्हरेज ICU रूम चे भाडे, अवयव दात्याचा खर्च, मातृत्व लाभ, मानसिक आजार कव्हरेज, यांचा समावेश होतो.
३. कोटक कुटुंब आरोग्य विमा योजना :
कोटक कुटुंब आरोग्य विमा योजना हि ३ लाख -२५ लाख विमा रखमेचे संरक्षण प्रधान करते. हि एक सर्व समावेशक योजना आहे जी कुटुंबातील सदस्यासाठी उत्कृष्ट वैशिष्ट्य ऑफर करते. त्यात अवयव दाता खर्च, निवासी रुग्णालयात दाखल करणे, रुग्णालयातील दैनंदिन रोख रक्क्म, एअर ऍम्ब्युलन्स कव्हरेज इत्यादींचा समावेश आहे.
४. मॅक्स बुपा हेअल्थ कंपॅनिअन हेल्थ इन्शुरन्स :
मॅक्स बुपा हेअल्थ कंपॅनिअन हेल्थ इन्शुरन्स परवडणाऱ्या दरात कुटुंबासाठी एक विशेष योजना ऑफर करते. हि विमा कंपनी १ लाख-१ कोटी विमा रकमेच्या पर्यायासह पॉलीसी प्रदान करते. या पॉलीसी द्वारे ऑफर केलेल्या काही फायद्यामध्ये रुग्णांमध्ये रुग्णालयात दाखल करणे,ओपिडी कव्हरेज, आयुष उपचार, अवयव दात्याचा खर्च, इत्यादी योजना समावेश आहे. शिवाय प्रीमियम च्या किमती परवडण्याजोग्या आहेत,ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक भारावर मात करण्याचे मार्ग मिळतात.
५. स्टार फॅमिली हेल्थ ऑप्टीमा विमा योजना:
स्टार हेल्थ हि आरोग्य विमा कंपन्यांपैकी एक आहे जी कुटुंबासाठी विस्तृत योजना ऑफर करते. हि विमा कंपनी पॉलिसि धारकांना १ लाख -२५ लाख ,विमा रकमेच्या पर्यायासह योजना निवडू देते. या योजनेत आरोग्य तपासणी,नवजात शिशु कव्हरेज, अवयव दाता कव्हरेज, रोड रुग्ण वाहिका चार्जेस,एअर ऍम्ब्युलन्स, प्री-हॉस्पिटलाइजेशन, पोस्ट-हॉस्पिटलाइजेशन, इत्यादी फायदे समाविष्ट आहे.
६. केयर हेल्थ केयर विमा योजना :
हि कंपनी ५ लाख-६ कोटी विमा रकम निवडु देते केयर हेल्थ केयर पूर्वी रेलीगेयर हेल्थ इन्शुरन्स म्हणून ओळखले जात होते. यात आयुष्य उपचार, वार्षिक आरोग्य तपासणी, अवयव दात्याचा खर्च, दैनंदिन भत्ता इत्यांदींचा समावेश होतो. हि भारतातील सर्वोत्तम कौटुंबिक विमा योजना आहे.