बोर फळाबद्दल माहिती :-Information about bore fruit In Marathi

बोर फळाबद्दल माहिती :-Information about bore fruit In Marathi:-   बोर हे फळ अनेक औषधी गुणधर्मासाठी फायदेशीर आहेत. या फळाला चायनीज सफरचंद म्हणून सुद्धा ओळखले जाते. भारतामध्ये हे फळ खूप जुने आहे या फळाचे जास्त नाव रामायणामध्ये पण या फळाचा उल्लेख केला होता. हे फळ सर्वाना आवडत असते. या फळात अनेक जीवनसत्वे,खनिजे आणि शर्करा यांसारखे अनेक औषधी गुणधर्म आहेत,या फळाची लागवड भारत,युरोप,चीन आणि रशिया या देशामध्ये बोर या फळाची लागवड केली जाते. हे फळ खायला चविस्ट आणि शरीरासाठी फायदेशीर आहेत.

या फळाचे मुरब्बा आणि लोणचे सुद्धा केले जातात. या फळाचे योग्य प्रमाणे सेवन जर नाही केले तर ते आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. हे फळ अनेक रोगांवर फायदेशीर फळ आहेत. बोर फळ हे भारत आणि चीन या देशाचे सर्वाना आवडणारे हे फळ आहेत. बोरच्या एकूण ५० प्रजाती आहे त्यामधल्या भारतामध्ये फक्त १८-२० प्रजाती आहेत. भारत मध्ये बोर हे फळ खूप प्रसिद्ध आहेत. बोर या फळाचे झाड उष्ण व कोरड्या जागेवर लागत असते. बोराच्या झाडाला काटे असतात बोर हे फळ भारतच मूळ फळ मानले जाते.

बोर फळाबद्दल माहिती :-Information about bore fruit

 

Information about bore fruit In Marathi

 

बोर या झाडाचे वर्णन :-Description of the tree Bor

बोर या झाडाला काटे असतात तर कुठल्या प्रजातीच्या झाडाला काटे नसतात. बोराच्या झाडाची उंची हे पंधरा ते वीस फुटापर्यंत वाढत असते. बोराच्या झाडाला हिरवी व पिवळी रंगाची फुल असतात. या फळाची झाडे जास्त नदीच्या काटेवर हि लागत असते. या झाडाच्या बिया जरी टाकल्या तरी हे झाड वापर असते. या झाडाची पाने आकाराने लहान असतात. बोर जेव्हा कच्ची असतात तेव्हा या फळाचा रंग हिरवा असतो व ते पिकल्यावर पिवळसर फिकट लाल रंगाची होत असतात. हे फळ खायला गोड व आंबट असते. बोराचा आकार हा गोल या लंबगोल या आकाराची असतात.

बोर या फळाची उत्पादन क्षेत्र :-Bor is the production area of ​​this fruit

आफ्रिका,चीन,भारत,श्रीलंका,ऑस्टेलिया या देशामध्ये बोराचे उत्पादन घेतले जातात. बोर या फळाची प्रजाती हे कौल बोर आणि सौवीर बोर या दोन जाती आहे सर्वात लवकर लागणाऱ्या जाती सफेदा,गोला,सेब,नरोल आणि संधुरा या लवकर लागणाऱ्या प्रजाती आहेत.

बोर या फळाचे पौष्टिक तत्व :-The nutrients of this fruit

या फळामध्ये अनेक प्रकारचे पौष्टीक तत्व आहेत. बोर या फळाला हिंदी मध्ये बेरी असे म्हणत होते,बोर या फळात पोटॅशियम,प्रथिने आणि कॅल्शियम यांसारखे पोषक तत्व या फळात आहेत. व्हीटॅमीन सी हे या फळाचे महत्वाचे घटक आहेत. कर्करोगासाठी बोर या फळाच्या बिया फायदेशीर आहेत. काही प्रमुख पोषक तत्वे खालीलप्रमाणे आहेत.

  • व्हिटॅमिन सी,ए आणि बी कॉम्प्लेक्स
  • कार्बोहायड्रेट
  • प्रथिने
  • चरबी
  • लोह आणि तांबे
  • कॅल्शियम आणि फ़ॉस्फरस
  • सोडियम
  • जस्त
  • लिंबाच्या रसामध्ये सापडणारे आम्ल
  • लिंबू खाण्याचे फायदे आणि तोटे

बोर फळ खाण्याचे फायदे :-The benefits of eating bored fruit

बोर फळ हे औषधी गुणधर्मासाठी खूप फायदेशीर आहेत. या फळाच्या अनेक आयुर्वेदिक औषधीसाठी याची पाने या बिया खूप फायदेशीर आहेत. हे फळ अपचन आणि पित्तशामक फळ आहेत. आयुर्वेदिक औषधीसाठी वापरले जाणारी फळाची पाने हि डिकोकोक्सन तयार करण्यासाठी या फळाचा उपयोग केला जातो. या फळात व्हिटॅमिन सी,कॅल्शियम,फॉस्फरस,लोह,झिंक आणि पोटॅशियम हे पोषक घटक या फळामध्ये आहेत. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढत असते आणि आपले शरीर मजबूत होत असते. बोर या फळाचा वापर औषधीसाठी व आजारांमध्ये उपचारासाठी सुद्धा केला जातो. बोर फळ खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

१. पचनविकार आणि कब्ज साठी सुद्धा हे फळ खूप फायदेशीर आहेत.

२. आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करीत असते आणि आपले शरीर मजबूत करण्याचे काम करते.

३. मेंदूच्या विकासाठी खूप फायदेशीर आहेत.

४. तणाव,निद्रानाश यांसारख्या आजारांसाठी खूप फायदेशीर आहेत.

५. बॅकटेरियापासून सुद्धा मदत करत असते. व याचे संरक्षण करत असते.

६. बोरांमध्ये असलेले कॅल्शियम हे आपल्या दातांसाठी आणि हाडांसाठी खूप महत्वाचे आहे याने आपले दात व हाड मजबूत करण्याचे काम करीत असते.

७. यकृताशी कुठली समस्या साठी बोर हे फळ लाभदायक आहेत.

८. आपल्या चेहऱ्यासाठी सुद्धा हे फळ फायदेशीर आहे. या फळात अँटी – एजिंग हे घटक आहे यामुळे आपला चेहरा स्वच्छ व सुंदर राहत असतो.

९. केसांसाठी बोर हे फळ लाभदायक आहे याने आपले केस चांगले राहत असते व केस वाढत असते.

बोर खाण्याचे नुकसान :-Loss of boredom

बोर या फळामध्ये पौष्टीक तत्व आहे या मुळे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हे फळ औषधी गुणधर्माचे आहे या फळात काही प्रमाणात नुकसान आहे. कारण आपल्या खाण्याची पद्धतीवर आहे,हे फळ जर जास्त प्रमाणात खाल्ले तर ते आपल्या साठी हानिकारक आहे. या फळाचे जास्त प्रमाणात जर आपण सेवन केले तर आपल्याला भूक,आळस,अतिसार न लागणे या बद्धकोष्ठता यांसारखे आजार होऊ शकतात. बोर खाण्याचे तोटे खूप कमी प्रमाणात आहे.

ज्या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास,जे लोक कमी प्रमाणात फायबर चे आहार करत असेल ,या ज्यांना फळाची एलर्जी असते त्यांनी बोर या फळाचे सेवन करणे टाळावे,जास्त जर बोर खाल्ले तर पोटात गॅस आणि गोळा पण होऊ शकतो व पोट सुद्धा दुखु शकते. कुटले पण फळाचे कमी प्रमाणात सेवन केले तर ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत. शरीरामध्ये जर कुटले आजार असल्यास बोराचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे .

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment