Life Insurance Benefits and Complete Information In Marathi

Life Insurance Benefits and Complete Information In Marathi:- जीवन विमा म्हणजे जर कोणी आपल्या परिवाराचा करतासारता जो कमावणारा असतो जर त्याला काही झाले या तो अपघातामध्ये गेला तर तेव्हा या जीवन विमाचा फायदा हा त्या कुटुंबाला होत असतो. या विमा पॉलिसी मध्ये अनेक प्रकार आहेत.

काही पॉलिसी कव्हर देतात या बचत आणि गुंतवणुकीद्वारे परतावा मिळण्याचा पर्याय देत असतात. म्हणजे हा रुल स्वता विमाधारकांसाठी फायदेशीर आहेत. आपल्या भारतामध्ये ८ प्रकारच्या जीवन विमा पॉलिसी आहेत. आपण स्वतःसाठी आपल्या आवश्यकतेनुसार आपण विमा पॉलिसी काढू शकतो.

Life Insurance Benefits and Complete Information

 

Life Insurance Benefits and Complete Information

 

आपल्या भारतामध्ये अनेक जीवन विमा योजना आहे आपल्याला दुसरे सांगणार तीच विमा पॉलिसी काढली पाहिजे असे नाही कारण अनेक प्रकारच्या पॉलिसी योजना आहेत त्यामुळे पॉलिसी काढत असताना त्या पॉलिसी ची माहिती घेऊनच ती पॉलिसी फॉर्म भरावा आणि त्या पॉलिसीच्या अटी आणि शर्ती माहित करून घ्याव्या कारण पॉलिसी काढल्यावर ती कंपनी तुमच्या अटी मान्य करणार नाही यासाठी पहिले कुठली पॉलिसी आपल्याला योग्य आहे ते माहिती करणे गरजेचे आहे आतातर इंटरनेट वर एका मिनिटात संपूर्ण माहिती मिळून जातात.

आपण जीवन विमा काढतो म्हटले तर अनेक कंपन्या आहेत. जीवन विमा म्हणजे एक वैक्ती आणि त्या विमा कंपनी शी जोडलेला करार आहे. जीवन विमा हे आजीवन जीवन विमा सुद्धा असते आणि जीवन विमा अशी असते या मध्ये अनेक प्रकार आहेत. सर्व कंपनीचे नियम सारखे नसतात जीवन विमा काढल्याने आपल्यामुळे आपल्या परिवाराचा फायदा होत असतो. विमा काढत असतात नॉमिनी साठी एकाचे नाव टाकाचे असते त्यालास तो पैसा मिळत असतो. याची सर्व माहिती विमा कंपनीकढे असते त्यांना हे सर्व माहिती असते. विमा चा फायदा खूप आहे फक्त विमा काढत असताना त्याची माहिती घेऊन विमा काढावा.

जीवन विम्याचे प्रकार :- Types of life insurance

 

Types of life insurance

 

१. मुदत विमा योजना – हि जी पॉलिसी आहे ती १० ,२० किंवा ३० वर्षासाठी आपण पॉलिसी काढू शकतो. या विमा पॉलिसी मध्ये आपण जितक्या वर्षासाठी पॉलिसी काढत असतो तितक्या वर्षासाठी ते कार्यरत असते. या जीवन पॉलिसी मध्ये परिपकवता लाभ मिळणार नाही ते फक्त बचत /नफा घटकाशिवाय जीवन संरक्षण करणार. इतर पॉलिसी च्या तुलनेमध्ये हे पॉलिसी स्वस्त आहे.

या पॉलिसी मध्ये मुदतीदरम्यान जर पॉलिसी धारकाला जर काही झाले या त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या परिवाराला विमा पॉलिसी अंतर्गत विमा रक्कम मिळत असते. याचा फायदा हा परिवाराला नक्कीस होत असतो. फक्त पॉलिसी काढत असताना त्याची माहिती घेऊनच पॉलिसी फॉर्म भरावा व त्याच्या सर्व अटी व शर्ती माहित करून घ्याव्या तरच तो विमा काढावा.

२. मनीबॅक विमा पॉलिसी – मनीबॅक पॉलिसी हि फक्त एंडॉमेंट पॉलिसी आहेत. म्हणजे या पॉलिसी मध्ये गुंतवणूक आणि विमा पॉलिसी याचा मिलाफ आहेत. या पॉलिसीचा महत्वाचा पॉईंट म्हणजे या विमा पॉलिसीमध्ये बोनससह विम्याची रक्कम पॉलिसीच्या कालावधी मध्ये हफ्त्यामध्ये परत केली जाते. या पॉलिसी मध्ये शेवटचा हफ्ता हा पॉलिसीच्या शेवटी उपलब्द राहते. या पॉलिसी मध्ये मुदतीदरम्यान जर पॉलिसी धारकाला जर काही झाले या त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या परिवाराला विमा पॉलिसी अंतर्गत विमा रक्कम मिळत असते. याचा फायदा हा परिवाराला नक्कीस होत असतो. या पॉलिसीचा महत्वाचा रूल म्हणजे या पॉलिसीचा प्रीमियम हा सर्वाधिक आहेत. या मुळे हे पॉलिसी जास्तीत जास्त काढत असते.

३. एंडॉमेंट पॉलिसी – या जीवन विमा पॉलिसी मध्ये गुंतवणूक आणि विमा हे दोनी असतात. या पॉलिसी मध्ये काही विशिष्ट कालावधीसाठी जोखीम कव्हर असतात. आणि जेव्हा या पॉलिसी ची शेवटची तारीख असते तेव्हा विमा कंपनी विमाधारखाला कालावधीच्या शेवटी बोनसह विमा रक्कम देत असते. यासोबतच हे पॉलिसी रकमेचे दर्शनी मूल्य पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर किंवा काही वर्षानंतर एंडोमेंट पॉलिसी अंतर्गत पैसे दिले जातात. काही विमा पॉलिसी मध्ये गंभीर आजार असला तर पैसे देत असतात. अशा विमा पॉलिसीमुळे अनेक लोकांना याचा फायदा मिळत असतो.

४. बचत आणि गुंतवणूक योजना – या पॉलिसी मुळे जीवन विमा योजना विमाधारक आणि त्याच्या कुटूंबाला भविष्यातील खर्चासाठी एकरकमीची निधीची हमी देत असते. अशा पॉलिसी केवळ अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टउत्तम बचत साधनेच देत नाही ,तर तुमच्या परिवाराला विमा पॉलिसी च्या संरक्षणाच्या स्वरूपात विशिष्ट रकमेची हमी सुद्धा देत असतात. या पॉलिसी च्या प्रकारामध्ये जीवन विमा श्रेणीमध्ये पारंपरिक आणि युनिट लिंक्ड अशा दोन्ही योजनांचा समावेश केला जातो. अनेक प्रकारचे पॉलिसी असतात आणि त्याच्या अटी सुद्धा सर्व वेगवेळ्या असतात.

५. युलिप – या पॉलिसीमध्ये संरक्षण आणि गुंतवणूक दोनी हे तसेच राहणार. पारंपरिक एंडॉमेंट इन्शुरन्स पॉलिसी आणि मनीबॅक पॉलिसीमध्ये तुम्हाला मिळणारे परतावे काही प्रमाणामध्ये खात्रीशीर असतात. Ulip मध्ये परताव्याची कोणती पण हमी नसते. कारण युलिप मध्ये गुंतवलेला भाग हा ब्रॉड्स आणि स्टॉकमध्ये गुंतवला जातो आणि तुम्हाला म्युच्युअल फंडासारखे युनिट्स मिळत राहतात जर तुम्हाला स्टॉकमध्ये पैसे लावाचे राहले तर स्वतःच्या गुंतवणुकीवर अवलंबून राहते किती लावावा आणि किती नाही याचा तुम्हाला फायदा या नुकसान दोनी सुद्धा होऊ शकणार यासाठी खबरदारी घेऊन पैसे लावावे.

६. आजीवन जीवन विमा – या प्रकारच्या पॉलिसी मध्ये तुम्हाला आयुष्यभर संरक्षण देण्याचे काम करत असते. आजीवन जीवन विमा म्हणजे आपले संपूर्ण आयुष्यभर विमा कंपनी सुरक्षा देण्याचे काम करत राहनार यामुळे आपली काळजी आता विमा पॉलिसी बघणार. या पॉलिसीमध्ये कुठलेही मुदत नसते. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर ,नॉमिनीला विम्याचा दावा मिळत असतो. म्हणजे तो पैसा त्याचा पैसा हा त्याच्या पत्नीला या ज्याचे नाव लिहून आहे त्याला मिळणारअनेक पॉलिसी मध्ये वयाची मर्यादा असते पण या पॉलिसीमध्ये काहीच मर्यादा नाही आहे.

इतर पॉलिसी मध्ये ६५-७० वर्षाची मर्यादा असते जर त्या नंतर मृत्यू झाला तर त्याच्या परिवाराला काहीच विमा मिळणार नाही कारण त्या पॉलिसी मध्ये असे लिहलेले असते. आणि उभा आजीवन पॉलिसीमध्ये जरी ९५ व्या वर्षी जरी त्याचा मृत्यू झाला तरी त्याच्या कुटूंबाला त्याचा जीवन विमा हा मिळत असतो. हा या विम्याचा फायदा आहेत. या पॉलिसीमध्ये प्रीमियम खूप जास्त आहे आणि या पॉलिसी धारकांना विमा रक्कम हि अंशतः काढण्याचा पर्याय आहे. या सोबतच या पॉलिसीवर कर्जाचा स्वरूपात पैसे सुद्धा घेऊ शकणार. हा विमा कंपनीचा खूप जास्त फायदा आहेत.

७. बाल विमा पॉलिसी – हे पॉलिसी लहान मुलांसाठी आहेत. या पॉलिसीमुळे मुलांचा शैक्षणिक खर्च आणि इतर गरजा असतात यासाठी त्यांचा विचार करून हि पॉलिसी काढण्यात आली. बाल विमा पॉलिसी मध्ये पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर एकरकमी रक्कम दिली जाते परंतु हि पॉलिसी लॅप्स होणार नाही आणि भविष्यातील सर्व प्रीमियम हे माफ केले जाणार आणि विमा कंपनी पॉलिसीधारकाच्या वतीने त्यात गुंतवणूक सुरु करत असते याचा फायदा हा लहान मुलाला होत असतो मुलाला त्याच्या ठराविक कालावधीमध्ये पैसे मिळणार. अशा या पॉलिसी चा लहान मुलांना खूप फायदा मिळत असतो.

८. सेवानिवृत्ती योजना – हि जी पॉलिसी आहे या पॉलिसीमध्ये जीवन विमा संरक्षण उपलब्ध असणार नाही. हि पॉलिसी फक्त एक निवृत्ती समाधान योजना आहे. या मुळे आपण आपले पैसे समोरच्या कामासाठी या आपल्या स्वतःच्या जीवनासाठी उपयोगी पडावा यासाठी हि पॉलिसी काढावी. आपला जो सेवानिवृत्ती वेतन असते ते जमा करून ते नंतर आपल्याला खर्चाला कमी पडणार.

हि पॉलिसी काढली तर काही धारावीक कालावधी नंतर आपला पैसे हा आपल्याला मिळणार हि पेन्शन आपल्याला वार्षिक या सहामाही आधारावर राहणार. याचा फायदा आपल्या नक्कीस मिळणार आपण जर ते पॉलिसी काढली तर याचा फायदा आपल्याला होणारच. कुठली पण पॉलिसी काढत असताना ती पहिले समजून घेणे गरजेचे आहे नाहीतर आपल्याला ती पॉलिसी समजणार नाही यासाठी विमा पॉलिसी चे अनेक प्रकार आहे माहिती करूनच पॉलिसी काढावी.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment