कमळ या फुलाची माहिती :-Lotus flower information In Marathi

कमळ या फुलाची माहिती :-Lotus flower information In Marathi:-  कमळ या फुलाची अनेक महत्वाचे गुणधर्म आहेत. तुम्हाला जर ताण, चिन्ता अशा पद्धतीची अनेक त्रास असल्यास तुम्ही कमळ या फुलाचा वापर करू शकता. कमळ फुल दिसायला खूप सुंदर आहे तेवढेच ते आपल्याआरोग्यासाठी फायदेशीर आहे. कमळ फुलाच्या पानापासून ते झाडापर्यंत अनेक औषधी गुणधर्म आहेत.कमळाच्या बिया सुद्धा उपयोगी पडतात. हिवाळ्यामध्ये जर कमळ या फुलाचे तेल केसांना व त्वचेला लावले

तर आपली त्वचा किंवा केस निरोगी राहण्यास मदत होते. आयुर्वेदामध्ये कमळ या फुलाच्या बिया खूप लाभदायक मानल्या जाते. आपल्या डोक्यातील ताण कमी करण्यासाठी कमळाच्या फुलाचा वापर केला जातो. कमळ या फुलाबद्दल महत्वाची माहिती किंवा आपल्या आरोग्यातील फायदे किती आहे ते आपण खालील प्रमाणे बघूया, आणि त्याचसोबत या फुलाचं इतिहास सुद्धा बघूया.

कमळ या फुलाची माहिती :-Lotus flower information

 

Lotus flower information In Marathi

 

कमळ फुलातील घटक:-Lotus flower component

या फुलामध्ये न्यूसिफेरीन आणि अपोमार्फिन हे दोन महत्वाचे आणि पोषक घटक असतात जे आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे आपले मन शान्त राहत असते. जर आपल्याला चिंता तणाव नैराश्य इत्यादी समस्या असणार तर या समस्या दूर करण्यासाठी हे फुल महत्वाचे आहे. या सोबतच या फुलामध्ये व्हिटॅमिन सी , बी आणि लोह, तांबे, जस्त, फायबर, इत्यादी पोषक घटक कमळ या फुलामध्ये आढळत असते.

कमळ फुलाचे आरोग्यासाठी फायदे :-Health benefits of lotus flower

१) जर तुम्हाला कुठला त्रास असेल किंवा चिंता, तणाव यासाठी कमळ या फुलाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल . त्यामुळे तुमचे मन शान्त राहते. आणि रक्तदाब नियंत्रित राहत असते.व आपल्या शरीरातील तापमान सामान्यपणे राहत असते. जर तुम्ही कमळाचे फुल स्वतःकडे किंवा रूममध्ये आणले तर तुम्हाला त्याचा अनुभव बघायला मिळणार. तुम्हाला त्याचा आनंद खूप मिळणार यामुळे तुमचा तणाव सुद्धा कमी होऊ शकतो. ते केसांसाठी कमळ या फुलाचे तेल लावू शकाल त्यामुळे तुमच्या डोक्यातील चिंता, तणाव , नैराश्य यांसारख्या अधिक असलेल्या समस्या नियंत्रित ठेवण्यासाठी या फुलाचे फायदे मिळू शकते.

२) कमळ या फुलमध्ये अँटी- ऑक्सिडेन्ट हे महत्वाचे घटक आहे. तुमच्या शरीरामध्ये एखादी वेदना असेल तर ती वेदना कमी करण्याचे काम कमळ करते. जर तुमचे शरीरातील हाड दुखत असेल तर कमल या फुलाचे तेल काढून लावले तर आराम मिळत असतो. हर्बल चहा जेव्हा बनवत असतो. तेव्हा कमळाची पाने आणि फुले टाका ते पिल्याने आपल्या शरीरातील जुनी दुखापत असते अशा दुखापतींना आराम मिळत असतो.

३) कमळाचे फुल त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. कारण या फुलामध्ये अँटी-एजिंग पोषक घटक आहे. त्यामुळे ते आपली त्वचा सुधारण्याचे काम करते असते. आपल्या त्वचेमध्ये एलर्जी सुद्धा असेल तर ते बरे करण्याचे काम करत असते. आपल्या त्वचेचा नैसर्गिक रंग ठेवत असतो. या फुलामध्ये अँटी-इन्फ्लेमन्तरी हे घटक आहेत. त्यामुळे पुरळ उठण्याची समस्या दूर करतात. आणि या फुलामध्ये व्हिटॅमिन ए सुद्धा आहे. त्यामुळे आपल्या त्वचेतील दीर्घकाळ तरुण आणि आपली त्वचा निरोगी व सुंदर ठेवण्याचे काम करत असते. आपल्या चेहऱ्याची त्वचा सुंदर दिसत असते.

४) कमळ हे फुल केसांना सुद्धा फायदेशीर आहे. य या फुलामध्ये अँटिऑक्सिडेन्ट घटक आहे. त्यामुळे आपले शरीर निरोगी राहत असते. या शरीरामध्ये असलेला रॅडिकल्स चा रोग नियंत्रित ठेवण्याचे काम करत असते. आपले टाळूचे सुद्धा आरोग्य चांगले ठेवत असते. टक्कल पण साठी सुद्धा ते फायदेशीर आहे. आपले केस निरोगी आणि दाट होण्यास मदत मिळत असते. आपल्या केसांना मजबूत करण्याचे काम करत असते.

कमल या फुलापासून हर्बल चहा कसा बनवायचा ?How to make herbal tea from lotus flower

सर्वात पहिले गॅसवर भांडे ठेवायचे त्यामध्ये दोन मोठी वाटी पाणी ठेवा व त्याला उकळी येऊ द्या. त्यानंतर कमळ या फुलाच्या पाकळ्या भांड्यामधे तोडून टाकावे. आणि पाणी अर्धवट राहिल्यानंतर गॅस बंद करण्याचे काम करावे . त्यामध्ये काही प्रमाणात मिरची पावडर टाकावे आणि त्याला चांगल्याप्रकारे मिसळवून त्याला गाळावे यामध्ये साखर टाकू नये जर तुम्हाला त्याची चव चांगली वाटत नसेल तर त्यामध्ये गूळ किंवा मध टाकू शकता. आणि ते पिऊ शकता. यामुळे जर तुम्हाला तणावाचा त्रास असल्यास जो तुम्ही कमळाच्या फुलापासून बनविलेला हर्बल चहा तो पिल्याने तुम्हाला त्याचा नकीच फायदा मिळू शकते.

कमळ फुलाची लागवड कशी करावी ?How to plant lotus flower

कमळ फुलाच्या बियांपासून कमल कसे लावावे हे आपण बघणार आहोत. सर्वात प्रथम तुमच्या परिसरात प्रसिद्ध असलेल्या एखाद्या रोपवाटिकांमध्ये जाऊन त्या बियांची खरेदी करावी. याबियांना कमळगट्टा असे म्हणतात. त्यानंतर ज्या बिया आणली आहे त्या बियांच्या वरचा थर काढून टाकावे. फोडत असताना सावधगिरीने फोडावे जास्त प्रमाणात बी नाही फुटली पाहिजे याची काळजी घ्यावी. कारण कमळाची रोपे नंतर वाढणार त्यामुळे सावधगिरीने बी फोडावे. त्यानंतर तोडलेल्या बिया एका ग्लास मध्ये

टाकावे आणि त्यामध्ये पाणी टाकून २४ तास ठेवावे दर २४ तासाला त्याचे पाणी बदलत राहावे दर ३ दिवसांनी त्याबियांपासून नवीन वाढ बघायला मिळणार यानंतर १५ दिवसानानंतर बियांच्या मुळांची वाढ होऊ लागते. त्या रोपांना जमिनीत लावण्याचे करावे रोपे लावत असताना कधीपण काली माती असणे गरजेचे आहे तेव्हाच ते झाड वाढत असते. व ते चांगल्या पद्धतीने झाड लागत असते.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment