“आजचा विद्यार्थी ज्ञानार्थी की परीक्षार्थी” निबंध मराठी मध्ये Essay on Today’s Student in Marathi

Aajcha Vidyarthi Dnyanarthi ki Pariksharthi Nibandh in Marathi
Aajcha Vidyarthi Dnyanarthi ki Pariksharthi Nibandh in Marathi

Essay on Today’s Student in Marathi: आजचा विदयार्थी हा आपल्या स्वतंत्र लोकशाही राष्ट्राचा भावी नागरिक आहे. वयाच्या अठराव्या वर्षीच त्याला मतदानाचा अधिकार मिळाला आहे. म्हणून विद्यार्थिदशेतच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा योग्य विकास होणे आवश्यक आहे. त्याला स्वतंत्रपणे निर्णय घेता आला पाहिजे. कोणत्याही समस्येबाबत त्याला निरपेक्ष, तर्कसंगत विचार करता आला पाहिजे. त्याची आपल्या देशावर नितांत निष्ठा हवी. आजचे शिक्षण अशा प्रकारचे नागरिक तयार करू शकत आहे का? या प्रश्नाला आपण छातीठोकपणे ‘हो’ असे उत्तर विद्यालये, महाविद्यालये विदयार्थ्यांची व्यक्तिमत्वे फुलवत नाहीत, तर केवळ परीक्षांच्या शकत नाही. कारण आजची कारखान्यातून वेकारांच्या झुंडी निर्माण करत आहेत.

आज लहान मुलांच्या जीवनातील आनंद ओरबाडून घेणारी कोणती बाब असेल, तर ती मिळवण्यासाठी अडीच-तीन वर्षांच्या बाळालाही परीक्षेला तोंड द्यावे लागते. खरे पाहता, लहान म्हणजे ‘परीक्षा’ होय. एखादया नावाजलेल्या शाळेतील पूर्व-प्राथमिक शाळेत प्रवेश मूल घरातल्यांना निरागसपणे कितीतरी प्रश्न विचारत असतात, तेव्हा ती खऱ्या अर्थाने ‘ज्ञानार्थी’ असतात; पण मोठी माणसे त्यांना ‘परीक्षार्थी’  बनवत असतात.

शाळांतील, महाविदयालयांतील मुले परीक्षांत उत्तम गुण मिळवण्यासाठी धडपडत असतात. त्यामुळे विदयार्थ्यांची मूलभूत ज्ञानाशी फारकत होते. आजकाल मोठ्या सुट्टीतही खास वर्गाचे अभ्यासक्रम विदयार्थ्यांवर लादले जातात. मग त्यांनी स्वतःला आवडेल ते वाचावे केव्हा? ज्ञान संपादन करून बहुश्रुत व्हावे कसे? ही सर्व जीवघेणी धडपड पदव्यांच्या पुंगळ्या मिळवण्यासाठी असते. पण पदवी मिळाली म्हणजे नोकरीची शाश्वती असतेच असे नाही. अठरा-वीस वर्षे अव्याहतपणे क्रमिक अभ्यासक्रम पार पाडण्याच्या धडपडीतून जीवनव्यवहाराचे ज्ञान संपादन होत नाही आणि मग वाट्याला केवळ वैफल्य येते.

पण हे असे घडण्याचे मुख्य कारण हे की, आजचे शिक्षण पुस्तकी बनले आहे. प्रत्यक्ष जीवनाशी, व्यवहारातील कृतीशी या ज्ञानाचा संबंधच राहिलेला नाही. शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेला विद्यार्थी आत्मविश्वासाने व्यवहारात वावरू शकत नाही; तो बावरलेला असतो. त्यामुळे शिक्षणावरचा विदयार्थ्यांचा वा समाजाचा विश्वास उडाला आहे. शिक्षणाविषयीची आस्था वा आदर नष्ट झाला आहे. म्हणून परीक्षेत कॉपी करणे, पैसे घेऊन प्रश्नपत्रिका फोडणे, पैसे चारून पदव्या मिळवणे या गोष्टींबद्दल कोणालाही खेद काहीच वाटत नाही.

ही स्थिती बदलली पाहिजे. शिक्षणाला व्यवसायाभिमुख बनवले पाहिजे. शिक्षण घेऊन प्रत्यक्ष परिस्थितीशी सामना करावा लागला की विदयार्थी ज्ञानाकडे गंभीरपणे बघू लागतील सचोटीने ज्ञान प्राप्त करू लागतील. साहजिकच ज्ञानाचा दर्जा उंचावेल आणि विदयार्थी ज्ञानार्थी बनतील.

Leave a Comment