५ फुलांचे औषधी गुणधर्म :-Medicinal properties of 5 flowers In Marathi

५ फुलांचे औषधी गुणधर्म :-Medicinal properties of 5 flowers In Marathi:-   फुल हे सर्व कामामध्ये ऊपयोगी येत असतात. या फुलाचा उपयोग मंदिरामध्ये असो किंवा सजावटीसाठी केला जातो. या फुलामध्ये औषधी गुणधर्म सुद्धा असतात. फुलापेक्षा जास्त प्रमाणात फुलांचा उपयोग औषधी गुणधर्मासाठी केला जातो. हे खूप कमी लोकांना माहित असते. फुल हे आपण घरातली कुंड्यामध्ये असो किंवा बागेत लावत असतो. यासोबत सफरचंद आणि संत्याची फुल बाहेर देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खात असतात.

या दोन्ही फळांचे फुले औषधी गुणधर्मसाठी पहिल्या नंबर वर आहे. या झाडाचे फुलाचा वापर पावडर या पदार्थामध्ये वापरला जातो. आपल्या शरीरातील अनेक आजरांना बरे करण्यासाठी उच्चं रक्तदाब, रक्तशुद्धी, त्वचेचा रोग यासाठी औषधी गुणधर्मासाठी ते फायदेशीर ठरते. यासोबतच आपण आज पाच फुलांचे औषधी गुणधर्म बघणार आहोत.

५ फुलांचे औषधी गुणधर्म :-Medicinal properties of 5 flowers

 

Medicinal properties of 5 flowers In Marathi

 

१) जास्वंद फुल :- Jaswant flower

जास्वंद फुल हे गणपतीसाठी आवडीने लोक वाहत असते. आणि गणपतीचे हे फुल खूप आवडीचे आहे. या फुलामध्ये औषधी गुणधर्म खूप प्रमाणात आहे. जास्वंद या नावापेक्षा हिबिसकस या नावाने या फुलाला ओळखत असते. जास्वंद या फुलाचे अनेक फायदे आहे. या फुलाचा उपयोग सॅलेड सजवण्यासाठी वापरात आणतात. या फुलाच्या पाकळ्या अँटी–ऑक्सिडेन्ट साठी फायदेशीर आहे. यामुळे आपल्या शरीरातील रक्तदाब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याचे काम करत असते. जास्वंद या फुलाचा पावडर बनवून नियमित खाल्ले तर केस गळतीची फायदेशीर ठरते. जास्वंद हे आयुर्वेदिक औषधाच्या दुकानांमध्ये याफुलाचा पावडर सहजपणे मिळत असते.

२)गुलाब फुल :-Rose flower

गुलाब फुल हे जास्त प्रेमी युगासाठी खूप महत्वाचे आहे. या फुलाचा वापर गाडी सजविण्यासाठी आणि या फुलाच्या पाकळ्या पाण्यामध्ये मिसळवून त्याने अंघोळ सुद्धा करत असतात. गुलाब या फुऊळाच्या पाकळ्या सर्व वास्तूमध्ये आपण मिळवून खाऊ शकतो. या फुलाचे अनेक फायदे आहे. या फुलाच्या पाकळ्या आईस्क्रीम, मिठाई सॅलेड आणि आपल्या जेवणामध्ये याचा उपयोग करत असते. आणि आपल्या हृदयारील आजार मधुमेह या आयुर्वेदिक औषधासाठी रामबाण उपाय म्हणून मानले जाते.

व या फुलांमुळे आपली पचनक्रिया सुद्धा सुरळीत राहते. हे फुल आपल्या चेहऱ्यासाठी सुद्धा लाभदायक आहे. हे फुल औषधी गुणधर्मासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. गुलाम फुलाच्या झाडाला व फ़ांदीला काटे असतात ते तोडताना सावधगिरीने तोडावे लागतात.हे फुल दिसायला खूप सुंदर आहे. व या फुलाच्या अनेक जाती आहे हे फुल अनेक आजारांवर फायदेशीर ठरू शकते.

३) लॅव्हेंडर फुल :-Lavender flower

लॅव्हेंडर फुल हे फुल सर्वात जास्तसजावटीसाठी उपयुक्त मानले जाते. या फुलाचा वापर सुगंधी पावडर म्हणून उपयोगात आणत असते. या फुलाचा पावडर अँटी-ऑक्सिडेन्ट म्हणून काम करत असते. आपल्या शरीरातील अनेक आजारांसाठी हे फायदेशीर आहे. मदुमेहासाठी, तणाव, जखमेवर लावण्यासाठी, त्वचेसाठी डोकेदुखीसाठी झोपेशी संबंधित इत्यादी रोगांसाठी या फुलाचा पावडरचा आपण उपयोग केला, तर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.या फुलाच्या पावडर मध्ये अनेक जीवनसत्वे आणि पोषक घटक आहेत. या फुलाचा पावडर हा अनेक शरीरातील आजारांवर फायदेशीर ठरू शकते हे फुल जास्त आपल्या घरातील सजावटीसाठी उपयोगी पडणारे फुल आहेत. या फुलाचा वापर अनेक कार्यक्रमात केला जातो.

४) शेवंती फुल :-Shevanti flowers

शेवंती फुलामध्ये मिनरल्स आणि अँटिऑक्सिडेन्ट हे पोषक घटक आहेत. ते आरोग्यासाठी फाययदेशीर आहे. या फुलाची चहा पावडर सुप्रसिध आहे. ती क्रिझॅरथरंम या नावाने सुरमार्केट मध्ये हा पावडर मिळत असते. आणि या फुलाचा पावडर औषधी दुकानात मिळत असते. या फुलाच्या पावडररच उपोयोग उच्चं रक्तदाब, छातीमध्ये दुखणे ,मधुमेह, ताप ,सर्दी ,डोकेदुखी इत्यादी आजारांवर या पावडरचा उपयोग केला तर ते फायदेशीर ठरू शकते. दाक्षिण चीन मध्ये शेवंती फुलाच्या पाकळ्यांचा फुलाचा चहा पावडर बनवून खूप प्रमाणात प्रसिद्ध आहे. शेवंती फुल हे आपल्या शरीरातील आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.

५) झेंडू फुल :-Marigold flower

झेंडू फुल हे अनेक सणासाठी जास्त प्रमाणात वापरत असतात. आपल्या सर्वांच्या घरी झेंडू फुल घराला हार बनविण्यासाठी किंवा सजावटीसाठी बाकीच्या फुलांच्या तुलनेत याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. देवघरामध्ये देवाला फुले वाहण्यासाठी आणि हे फुल औषधी गुणधर्मासाठी खुप फायदेशीर आहे या फुलाला इंगजी मध्ये marigold हर्बल्स या नावाने जास्त प्रमाणात ओळखत असतात. या फुलाचे औषधी गुणधर्म अनेक लोकंना माहीती नाही आहे. या फुलच्या पाकळ्यांचा जर आपण पावडर तयार केला तर तो अनेक जखमा भरण्यासाठी किंवा मुंग्या चावल्याने यांवर या फुलाचा पावडर लावला तर तो त्रास कमी होतो.

या फुलाचा चहा सुद्धा बनवत असतात. या चहाचे अनेक प्रकार आहेत . या फुलाचा चहा पिल्याने पोटातील गॅस ,पाय दुखणे ,डोळे, तोंड , त्वचेवरील आजार. यासाठी जर या पावडरचा आपण वापर केला तर ते आपल्याला नक्की फायदा मिळू शकतो.या फुलाचा पावडर औषधी गुणधर्मासाठी रामबाण उपाय आहे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment