Pani Puri Recipe With Homemade In Marathi

Pani Puri Recipe With Homemade In Marathi:- पाणीपुरी हा पदार्थ सर्वांचा आवडीचा पदार्थ आहे. पाणीपुरी ला गोलगप्पे सुद्धा म्हटले जाते. पाणीपुरी म्हटलं कि लहान असो या मोठे सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतेच. क्वचितच कोणी असेल ज्याला पाणीपुरी आवडत नाही. पाणीपुरी हा पदार्थ सर्वात जास्त मुलींना आवडते.

 

Pani Puri Recipe

 

 

पाणीपुरी खाण्याची मज्जा काही वेगळीच असते आणि पाणीपुरी खाताना पोट भरेल पण मन भरणार नाही. आणि पाणीपुरी हा जास्त महागडा पदार्थ नाही. सर्वांच्या खिशाला परवडणारा असा पदार्थ आहे. अनेक लोकांना रस्त्यावरचे पाणीपुरी खूप आवडते. जेव्हा आपण पाणीपुरी घरी बनवत असतो, पण रस्त्यावरच्या पाणीपुरीची चव आपल्याला घरच्या पाणीपुरीला येत नाही. आपण पाणीपुरी घरी सुद्धा बनवू शकतो.

कधी कधी आपण बाहेरची पाणीपुरी खात असतो तर आपल्याला आजार पण होऊशकतो.आपल्याला जर आपली तब्येत जर चांगली ठेवायची असेल तर आपण घरी बनवून खाऊ शकतो. पाणीपुरी बनवणे अगदी सोप आहे. पाणीपुरीची बनव्यासाठी जास्त साहित्य पण लागत नाही. पाणीपुरी बनवायला जास्त वेळ लागत नाही म्हणजेच जास्तीत जास्त १५-२० मिनिटे लागतात. पाणीपुरीची रेसिपी खालीलप्रमाणे आहे.

पाणीपुरी साठी सामग्री खालील प्रमाणे आहे- The ingredients for panipuri are as follows

 

The ingredients for panipuri are as follows

 

खालील सामग्री हि ४-५ लोकांसाठी आहे.

 • १ कप रवा
 • १/४ टी स्पून बेकिंग पावडर
 • मीठ चवीनुसार
 • २ चमचे तेल
 • १/२ कप मैदा
 • २ बटाटे
 • १/२ कप चणे
 • कोथिंबीर
 • १ कांदा
 • १ टी स्पून जिरा पावडर
 • १ टी स्पून चाट मसाला
 • काळे मीठ चवीनुसार
 • पुदिन्याची पाने
 • १/४ टी स्पून लाल मिरची
 • १ टी स्पून चिंच
 • १ हिरवी मिरची
 • २ तुकडे गूळ

पाणीपुरी बनवण्याची विधी:- Procedure for making Pani puri:

पाणीपुरी तयार करण्यासाठी सर्वप्रथम मैदा आणि रवा घ्या आणि त्यात बेकिंग पावडर घाला. आणि त्यांनतर थोडे गरम पाणी करावे त्याला थोडे कोमट होऊ द्यावे त्यांनतर मैदा आणि रवा मिक्स करून त्यात कोमट पाणी टाकून मळून घ्यावे. आधी थोडे मिक्सचर कडक ठेवावे आणि पीठ मळून झाल्यावर ते २०-२५ मिनिटे ओल्या कपड्याने झाकून ठेवावे. आता थोडा वेळ ठेवा. काही वेळाने आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि आणि गोळे करत असताना गोळे मोठे होऊ देऊ नका नाहीतर

पाणीपुरीचा आकार मोठा होईल . त्यांनतर आता हे गोळे लाटून घ्या. आणि ते जास्त मोठे लाटू नका. लाटलेले गोळे ओल्या कपड्याने झाकून ठेवावे. कढईत तेल घ्यावे आणि ते तेल कडक गरम होऊ द्या. आणि त्यात लाटलेल्या पुरी टाका आणि त्या तळून घ्या. आणि ते थोडे दाबा म्हणजे ते छान फुगतात. आणि ते हलका सोनेरी होइपर्यंत त्यांना तळून घ्यावे. आणि आता पाणीपुरी तयार झाल्यावर पाणीपुरीच पाणी तयार करा. त्यासाठी कोथिंबीर आणि पुदिना धून घ्यावा. आणि त्यात लसूण,मिरची, अद्रक, टाकून

मिक्सर मध्ये छान वाटून घ्यावे. आणि भिजवलेली चिंचेच पाणी काढून घ्या आणि त्यात वाटलेला मसाला आणि मीठ,गूळ जिरा पाउडर, चाट मसाला टाकून मिक्स करून घ्यावे, आणि हा मसाला पाण्यात मिक्स करावा. आणि जर तुम्हाला पाणी जास्त चटकदार बनवायचे असेल तर त्यात मसाले जास्त टाकावे. आता पाणीपुरीच पाणी तयार झालेल आहे. आता तयार झालेली पाणीपुरी आलू आणि चणा टाकून त्या चटकदार पाण्यासोबत खावे.

आणि आपल्या मित्रांना पण आवडीने खायला द्यावे. पाणीपुरी १० रुपयापासून विकायला असतात. पाणीपुरी आता लग्नामध्ये सुद्धा आवर्जून असते. पाणीपुरीची क्रेज आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत दिसून येते.

 

 

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment