Suryakumar Yadav Biography, Career, Net Worth, Family, Age In Marathi

Suryakumar Yadav Biography, Career, Net Worth, Family, Age In Marathi:- सूर्यकुमार यादव हा एक भारतीय क्रिकेट पटू आहे. त्याचे पूर्ण नाव सूर्यकुमार अशोक यादव असे आहे. सूर्यकुमार यादव हा जास्त T२० आणि ODI फॉरमॅट मध्ये खेळत असतो. तो IPL मध्ये मुंबई इंडियन्स टीम कडून खेळतो. तो उजव्या हाताचा फलंदाज आहे.

Suryakumar Yadav Biography, Career, Net Worth, Family, Age

 

Suryakumar Yadav Biography, Career, Net Worth, Family, Age

 

आणि कधी कधी तो उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करत असतो. सूर्यकुमार यादव चा जन्म १४ सप्टेंबर १९९० रोजी मुंबई येथे झाला होता. त्याचे २०२२ चे वय ३१ वर्ष आहे. सूर्यकुमार यादव ची उंची ५ फुट ११ इंच असून त्याचे वजन ७५ किलो आहे. सूर्यकुमार यादवला लहानपणापासून क्रिकेट ची आवड होती. क्रिकेट शिवाय त्याला बॅडमिंटन खेळायची आवड होती.

त्याचे वडील हे भाभा अणुसंशोधन केंद्रात इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्ह्णून मुंबई येथे काम करत होते. सुरुवातीला सूर्यकुमार यादव गल्ली क्रिकेट खेळत असे. त्याच्या वडिलांनी त्याला लहानपणी क्रिकेट खेळताना बघितले त्यांनतर त्याला वडिलांनी चेंबूर च्या बिएआरसी कॉलनी मधील स्पोर्ट अकॅडेमि प्रवेश मिळवून दिला. त्यांनी त्या अकॅडेमि मध्ये प्रशिक्षकाच्या योग्य मार्गदर्शनाखाली त्याने क्रिकेट चे कौशल्य शिकले.

त्याने समोर एल्फ वेंगसकर अकॅडेमीत प्रवेश केला. सूर्यकुमार चे शालेय शिक्षण अनु ऊर्जा सेंट्रल स्कूल मुंबई येथे पूर्ण केले,त्यांनतर त्याने समोरचे शिक्षण मुंबई च्या अनु ऊर्जा जुनिअर कॉलेज मधून इंटरमीजिएट हा कोर्स पूर्ण केला. आणि त्यांनतर मुंबईच्या पिल्लई कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स मधून बी.कॉम पूर्ण केले. सूर्यकुमार यादव ने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे काही सोशल मीडिया वर शेअर केले नाही.

पण सूर्यकुमार यादव चा विवाह झालेला आहे. प्ररंतु त्यांचा विवाह देवीका सोबत २०१६ मध्ये झाला आहे. त्यांची पत्नी देविका ही एक व्यवसायी नृत्य शिक्षिका आहे. आणि ती भारतातील दक्षिण कुटुंबातील आहे. परंतु त्यांना एकही अपत्य नाहीत. सुरीकुमार यादवने त्यांचे संपूर्ण लक्ष क्रिकेटकडे वेधले आहे. आणि त्यांनी त्यांचा संपूर्ण वेळ क्रिकेटला दिला आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष देण्यास खूप कमी वेळ मिळत असतो.

SURYAKUMAR YADAV CAREER

 

SURYAKUMAR YADAV CAREER

 

सूर्यकुमार यादव ने २०१०-२०११ मध्ये रणजी ट्रॉफी मध्ये मुंबई टीम कडून दिल्ली विरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये पदार्पण केले. त्यांनतर ऑक्टोबर २०१७ मध्ये त्याची २०१८-२०१९ देवधर ट्रॉफी साठी भारत सी संघात त्याची निवड झाली होती. आणि त्यांनतर सय्यद मुश्ताफ अली ट्रॉफी मध्ये २०२०-२०२१ मध्ये त्याने मुंबई क्रिकेट संघाचा कर्णधार बनला होता. २०१२ साली IPL पाचव्या आवृत्तीत मुंबई इंडियन्स टीम ने त्याला विकत घेतले.

त्या साली त्याने फक्त एक सामना खेळला होता त्या सामन्यात त्याने एकहि न काढता तो बाद झाला. त्यामुळे त्याला वाईट वाटले होते. त्यांनतर २०१४ साली कोलकाता नाइट रायडर्स ने त्याला IPL मध्ये विकत घेतले. त्यानं तेव्हा मुंबई इंडियन्स विरुद्ध सामना होता तेव्हा त्या सामन्यात सूर्यकुमार यादव ने २० चेंडूत ४६ धाव काढून संघाला विजय मिळवून दिला होता. तो सामना ईडन गार्डन मध्ये खेळला होता. त्याने कोलकाता साठी अनेक सामने खेळले होते.

२०१८ साली त्याचे चांगले प्रदर्शन पाहून मुंबई इंडियन्स टीम ने त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत रु ३.२ कोटी ला त्याला विकत घेतले. तेव्हापासून तो मुंबई इंडियन्स टीम कडून खेळात आहे. १४ मार्च २०२१ रोजी इंग्लंड विरुद्ध पहिल्या T२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केले. त्या मालिके मध्ये सूर्यकुमार ला चौथ्या सामन्यांमध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती.

त्याने त्या सामन्यात पहिल्या चेंडू मध्ये षटकार मारला होता. T२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये असा करणारा पहिला भारतीय क्रिकेटर ठरला होता. त्याने १८ जुलै २०२१ रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले. जुलै २०११ मध्ये त्याला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात बदली म्हणून बोलवण्यात आले होते.

SURYAKUMAR YADAV’S NETWORTH

 

SURYAKUMAR YADAV'S NETWORTH

 

 • सूर्यकुमार यादव ची संपूर्ण संपत्ती ३० कोटी एवढी आहे. त्यातील त्याचे मासिक उत्पन्न ७५ लाखापेक्षा जास्त आहे. आणि त्याचे वार्षिक उत्पन्न ८ कोटी एवढे आहे.

सूर्यकुमार यादव ची IPL मधली बोली:- Suryakumar Yadav bid in IPL

 

Suryakumar Yadav bid in IPL

 

 

 • मुंबई इंडियन्स- २०११- रु १०,००,०००
 • मुंबई इंडियन्स-२०१२- रु १०,००,०००
 • मुंबई इंडियन्स-२०१३- रु १०,००,०००
 • कोलकाता नाईट रायडर्स- २०१४- रु ७०,००,०००
 • कोलकाता नाईट रायडर्स- २०१५- रु ७०,००,०००
 • कोलकाता नाईट रायडर्स-२०१६- रु ७०,००,०००
 • कोलकाता नाईट रायडर्स-२०१७- ७०,००,०००
 • मुंबई इंडियन्स- २०१८- रु ३,२०,००,०००
 • मुंबई इंडियन्स-२०१९- रु ३,२०,००,०००
 • मुंबई इंडियन्स-२०२०- रु ३,२०,००,०००
 • मुंबई इंडियन्स-२०२१- रु ३,२०,००,०००
 • मुंबई इंडियन्स-२०२२- रु ८०,०००,०००
Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment